Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthUric Acide चा स्तर सामान्य करण्यासाठी सोप्या टीप्स

Uric Acide चा स्तर सामान्य करण्यासाठी सोप्या टीप्स

Subscribe

युरिक अॅसिड आपल्या मुत्रपिंडात तयार होणारा एक वेस्ट प्रोडक्ट आहे. जो आपल्या मुत्रपिंडाच्या मार्गाने बाहेर पडते. पुरुषांच्या शरिरतात युरिक अॅसिडचा सामान्य स्तर 3.5 ते 7 mg/dL मानला जातो. चर महिलांमध्ये हाच स्तर 2.4 ते 6 mg/dL पर्यंत सामान्य स्तर मानला जातो. युरिक अॅसिडला कोणत्याही औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित करता येऊ शकते.

तज्ञ असे म्हणतात की, व्यक्तींनी युरिक अॅसिडला नियंत्रणात ठेवण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइलची सवय लावली पाहिजे. जसे की, वेळेवर झोपणे-उठणे आणि खाणं-पिणं. रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यापासून दूर रहावे. एकाच ठिकाणी खुप तास बसून राहण्याची सवय ही मोडावी.

- Advertisement -

युरिक अॅसिडची समस्या असलेल्या रुग्णांनी भाज्या आणि फळांचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त नॉन वेज आणि हाय प्रोटीन फूड्सचे सेवन ही कमी करावे. नॉन वेज खाल्ल्याने युरिक अॅसिड ट्रिगर होऊ शकतो आणि गाउटची समस्या उद्भवू शकते. त्यामुळेच नॉन-वेज आणि जंक फूड पासून दूर रहावे.

तसेच युरिक अॅसिड कमी करण्यासाठी प्रत्येक दिवशी कमीत कमी 30 मिनीटे तरी व्यायाम करावा. अथवा अन्य फिजिकल अॅक्टिव्हिटी कराव्यात. चालणे हे सुद्धा फायदेशीर ठरु शकते. फिजिकली अॅक्टिव राहिल्याने शरिरात युरिक अॅसिडचा स्तर मॅनेज होण्यास मदत होते.

- Advertisement -

तज्ञांनुसार युरिक अॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी प्रत्येक दिवशी 2-3 लीटर पाणी प्यावे आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवावे. असे केल्याने युरिक अॅसिड शरिरातून बाहेर निघण्यास मदत होते. या व्यतिरिक्त वेळोवेळी चेकअप करत रहावे. यामुळे युरिक अॅसिडबद्दल सुरुवातीच्या स्तरावेळीच कळेल, जेणेकरुन तुम्ही ते नियंत्रित करु शकता. लक्षात ठेवा जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं घेत असाल तर आपल्या मर्जीने ती बंद करु नका.


हेही वाचा- पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचा फर्टिलिटीवर होतो असा परिणाम

- Advertisment -

Manini