सगळेजण त्वचेवर विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतात. अशातच नैसर्गिक गोष्टींमुळे त्वचेचे कमी नुकसान होते. म्हणूनच तज्ञ देखील त्यांचा वापर करण्याची शिफारस करतात. एलोवेरा जेल हे त्वचेवर लावले जाते. याच्या वापराने त्वचा मऊ तर होतेच शिवाय त्वचा निरोगी राहते. तसेच चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावण्याचे फायदे आता आपण पाहणार आहोत.
एलोवेरा जेलने त्वचेचे पोषण कसे करावे
- एलोवेरा जेल त्वचेचे पोषण करण्यास मदत करते.
- यामध्ये असलेले व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे त्वचेवर चांगले टिकून राहतात.
- जे निरोगी त्वचेसाठी फायदेशीर असतात.
- महत्वाचे म्हणजे एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात.
- हे जीवनसत्त्वे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम करतात.
कोरफडीने असा करा चेहरा हायड्रेड
- एलोवेरा जेल रात्री चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.
- एलोवेरा जेलमध्ये पाणी असते.
- पाणी त्वचा तसेच शरीराला हायड्रेट करण्याचे काम करते.
- कोरड्या त्वचेवर कोरफडीचे जेल लावल्याने त्वचा मुलायम होते.
- Advertisement -
काळे डाग हलके करण्यासाठी वापरा एलोवेरा जेल
- चेहऱ्यावरील पिंपल्समुळे काळे डाग पडतात. विशेषतः जेव्हा मुरुम फोडले जातात तेव्हा हे डाग जास्त येतात.
- काळे डाग हलके करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करा.
- एलोवेरा जेलमध्ये 2 थेंब व्हिटॅमिन ई तेल आणि 5 थेंब लिंबाचा रस मिसळा.
- ही पेस्ट डाग आलेल्या भागावर लावा.
- आठवड्यातून दोनदा अशाप्रकारे एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग कमी करता येतात.
एलोवेरा जेल चेहऱ्यावर कसे वापरावे
- सर्वप्रथम, चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा, जेणेकरून त्वचेवर असलेली घाण साफ होईल.
- चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिंझर वापरा.
- आता तळहातावर थोडे कोरफडीचे जेल घ्या. संपूर्ण चेहऱ्यावर जेल लावा.
- हलक्या हातांनी चेहरा चोळा आणि जेल त्वचेत शोषून घेऊ द्या.
- तुम्हाला हवे असल्यास खोबरेल तेल आणि गुलाबपाणी मिक्स करून तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता.
एलोवेरा जेल घरी कसे बनवायचे?
- एलोवेरा जेल बाजारात उपलब्ध आहे.
- जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर शुद्ध कोरफडीचे जेल वापरायचे असेल तर ते घरीच बनवा.
- सर्व प्रथम कोरफड वनस्पतीचे चार-पाच काप कापा.
- आता चाकूच्या मदतीने त्यांना सोलून घ्या.
- मोठ्या चमच्याने जेल बाहेर काढून घ्या.
- हे जेल मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. असे केल्याने ढेकूळ राहत नाही.
- घरच्या घरी कोरफडीचे जेल तयार आहे.
_______________________________________________________________________