Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty काकडीच्या फेस पॅकचा 'या' वेगवेगळ्या पद्धतीने करा वापर

काकडीच्या फेस पॅकचा ‘या’ वेगवेगळ्या पद्धतीने करा वापर

Subscribe

काकडी फक्त आरोग्यासाठीच नाही तर चमकदार त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही चेहऱ्याला जास्त प्रमाणात कॉस्टमॅटिक वापरत असाल तर ते चेहऱ्याच्या आरोग्यासाठी योग्य मानले जात नाहीत. काकडीमुळे चेहर्‍यावर चमक येते. काकडीपासून आपण घरच्या घरी फेस पॅक तयार करु शकतो. जो तुमच्या एकूणच चेहऱ्याच्या स्किनसाठी फायदेशीर आहे.

काकडीच्या फेसपॅकचा असा करा वापर

  • मुलतानी मातीमध्ये 3 चमचे काकडीचा रस व काही थेंब गुलाबपाणी मिळून मिश्रण एकत्र करुन घ्या. हा तयार पॅक 15 मिनिटे त्वचेवर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्स नाहीसे होतात.
  • काकडीच्या रसात 1 चमचा एलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटानंतर चेहरा गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल.
  • 2 चमचे बेसनमध्ये 2-3 चमचे काकडीचा रस मिसळा. हे मिश्रण 20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. नंतर गरम पाण्याने चेहरा धुऊन टाका. याने त्वचेवरील डाग दूर होतील.
  • काकडीच्या पेस्टमध्ये दही मिसळा. चेहर्‍यावर या मिश्रणाने मालीश करा. 10-15 मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. हे ड्राय स्कीनवर उपयोगी ठरेल. तसेच पिंपल्सची समस्याही सुटेल.
  • काकडी आणि ओट्सची पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. डेड स्कीनसाठी हे फायदेशीर ठरेल.
- Advertisement -

  • काकडी आणि टोमॅटो मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटाने गार पाण्याने चेहरा धुऊन टाका याने त्वचा उजळेल.
  • काकडी घेऊन तिचे बारीक काप करुन घ्या. त्यानंतर त्यात 1 चमचा ओट्स, 1 चमचा दही आणि 1 चमचा मध एकत्र करुन मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हा तयार झालेला पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या.
  • काकडीची पेस्ट तयार करुन घ्या. त्यात लिंबाचा रस आणि अंड्याचा पांढरा भाग मिसळा. हे तयार मिश्रण ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल.
  • प्रथम काकडीची पेस्ट तयार करुन त्यामध्ये 5 चमचे मध आणि लिंबाचा रस मिसळून एकत्र करुन घ्या. त्यानंतर त्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून 15 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा यामुळे चेहरा चमकतो.

 


हेही वाचा : आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठी फळांचा ‘असा’ करा वापर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini