Tuesday, May 21, 2024
घरमानिनीCleaning Hacks : घर असं ठेवा डस्ट फ्री

Cleaning Hacks : घर असं ठेवा डस्ट फ्री

Subscribe

स्वच्छ घर सर्वांनाच आवडते. घरातील सर्व गोष्टी नीटपणे मांडलेल्या असाव्यात आणि त्यावर धूळ साचू नये असे नेहमीच वाटते. पण घराच्या साफसफाईचे काम खूप अवघड आहे. अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. अशा परिस्थितीत काही क्लीनिंग टिप्स लक्षात ठेवा, जे तुम्हाला तुमचे घर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया काही खास क्लीनिंग टिप्स.

खिडकी

खिडकी स्वच्छ करण्यासाठी, पाणी आणि व्हिनेगरचे द्रावण तयार करून स्प्रे बाटलीमध्ये भरा. आता खिडकीवर वरपासून खालपर्यंत स्प्रे करा. आता खिडकी स्वच्छ कापडाने पुसून टाका. खिडकीच्या खालच्या भागातील धूळ माती काढण्यासाठी आधी केसांना मेहंदी लावण्याचा एखादा ब्रश, टूथ ब्रश घ्या आणि त्याच्या साहाय्याने या भागातील माती आणि घाण एक बाजूला घ्या.घाण निघाल्यानंतर खाली धूळ आणि मातीच उरते. तर ही माती काढण्यासाठी कागदाचा एक तुकडा घ्या आणि तो त्या खाचेमध्ये टाका. त्यानंतर भ्रुषच्या साहाय्याने ती माती कागदावर घ्या आणि बाहेर काढा.

- Advertisement -

कीबोर्ड साफ करणे

जवळजवळ प्रत्येक जण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरतो. पण त्याच्या कीबोर्डवर साचलेल्या घाणीकडे फार कमी लक्ष दिले जाते. जर तुमचा कीबोर्ड खराब झाला असेल आणि त्यावर धूळ जमा झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरा. हे सर्व कीज् स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल.

टीव्ही स्क्रीन

टीव्ही स्क्रीन साफ ​​केल्यानंतर लगेच धूळ बसते त्यामुळे साफसफाईपूर्वी फॅब्रिक सॉफ्टनरमध्ये साफ करणारे कापड भिजवा आणि नंतर स्क्रीन पुसून टाका.

- Advertisement -

पंखा

बहुतेक लोक सणासुदीच्या काळातच पंख्याची स्वच्छता करतात. परंतु असे केल्याने पंख्यावर साचलेली घाण साफ होण्यास बराच वेळ लागतो. पंखा स्वच्छ करायला जितका जास्त वेळ लागतो तितकाच तो घासणेही कठीण. पंखे साफ करताना त्यांच्या पातींवरील कचरा कपड्यांवर किंवा खालच्या कार्पेटवर पडू शकतो. अशा वेळी पिलो कव्हर पंख्याच्या पातींमध्ये अडकवून मग पंखा पुसावा.

स्विच बोर्ड

लोक अनेकदा वर्षभर त्यांच्या घरातील स्विच बोर्ड साफ करत नाहीत, त्यामुळे ते काळे पडतात. स्विच बोर्ड देखील स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट पाण्याचा वापर करा. त्यात एक कापड भिजवा, पाणी पिळून घ्या आणि स्वीच बोर्ड स्वच्छ करा. स्वीच बोर्ड साफ करताना मेन लाईट बंद करा. अन्यथा पाण्यामुळे विजेचा शॉक लागू शकतो.

गादी

गादी धुणं केवळ अशक्य आहे. ती मळू नये म्हणून आपण त्यावर कव्हर टाकतो. कव्हर कितीही धुतलं, तरी मूळ गादी काही स्वच्छ होत नाही. अशा अडचणीमध्ये तुमच्या कामी बेकिंग सोडा आणि व्हॅक्युम क्लिनर येईल. गादीवर बेकिंग सोडा पसरवा आणि काही वेळ तसाच ठेवा. त्यानंतर व्हॅक्युम क्लिनरनं गादी साफ करा. यामुळे गादीचा येणारा कुबट वास आणि त्याच्यावरील डाग नाहीसे होतील. याचपद्धतीनं जुने सोफेही स्वच्छ केले जाऊ शकतील.

धूळीविरोधात उचला ही पावलं

घरातील धूळ हा जीवनाचा एक भाग आहे. धूळ बंद घरातही गोळा होते. परंतु अशी काही पावले उचलली जाऊ शकतात, जेणेकरून घरात धूळ कमी गोळा होईल. फूटरेस्ट वापरा आणि शूज घराबाहेर काढा. घरात प्रवेश करण्यापूर्वी मुले धुळीमध्ये खेळून घरी येताना आधी हात-पाय स्वच्छ धुण्यासाठी सांगा. पाळीव प्राण्यांना स्वच्छ करा. साबण किंवा डिटर्जंट वापरून ओल्या कापडाने घरात स्वच्छता ठेवा.

- Advertisment -

Manini