Sunday, February 18, 2024
घरमानिनीKitchenरुचकर जेवणासाठी वापरा 'या' टिप्स

रुचकर जेवणासाठी वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

10 Plant Forward Cookbooks that Make Greener Eating Easier – Food Tank

- Advertisement -

 

 

- Advertisement -
  • तळणीचे मोदक मंद आचेवर तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.
  • तळणीचे मोदक करताना पारीचे पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बऱ्याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते. नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दूध लावल्यास कळी पक्की बंद होते.
  • रात्रीच्या उरलेल्या वरण-भातात गव्हाचे, डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद जिरेपूड, चिरलेला कांदा, लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला खूपच छान लागते.

Cooking with mince | safefood

  • गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ पारदर्शक नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.
  • 3-4 दिवस लिंबू ताजे रहाण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावे. वापरते वेळी फ्रिजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरावे.
  • पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.
  • पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.

हेही वाचा :

Kitchen Tips : किचनमधील हटके टीप्स

- Advertisment -

Manini