Saturday, April 13, 2024
घरमानिनीवर्षभर झाडे हिरवीगार राहतील, वापरा या टिप्स

वर्षभर झाडे हिरवीगार राहतील, वापरा या टिप्स

Subscribe

अनेकजणांना गार्डनिंगची आवड असल्याने घरातील बाल्कनीत विविध प्रकारची झाडे लावली जातात. ही झाडे हिरवीगार आणि टवटवीत दिसल्यावर बाल्कनीसह घराची शोभा वाढते. मात्र, जेव्हा पाने पिवळी किंवा कोमेजू लागतात तेव्हा मात्र ते चांगले दिसत नाही. अशावेळी रोपे पुन्हा हिरवीगार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. यासाठी आज आम्ही तुम्हाला वर्षभर झाडे हिरवीगार राहण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत

हिंग –

- Advertisement -

रोपांची पाने पिवळी पडणार नाही – रोपांची पाने अनेकदा पिवळी पडतात, ते रोखण्यासाठी स्वयंपाक घरातील हिंगाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा हिंग घ्या. आता यात ताक टाका आणि तयार लिक्विड २० ते २५ मिनिटे झाकून ठेवा. काही वेळाने हे लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरून रोपांवर फवारणी करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा या लिक्विडची फवारणी केल्यास झाडांची पाने पिवळी पडणार नाही.

खत – हिंगाचा वापर तुम्ही खत म्हणूनही करू शकता. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यावे. त्यात एक कप चहापावडर आणि एक चमचा हिंग टाकून मिक्स करा. तयार लिक्विड आठवडाभर झाकून ठेवा आणि नंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून रोपांवर फवारणी करा.

- Advertisement -

हिरवीगार राहण्यासाठी – अनेकदा रोपांची योग्यरीत्या देखभाल करूनही रोपे कोमेजतात. अशावेळी हिंगाचे लिक्विड रोपांच्या मुळांशी टाका. असे केल्याने झाडे हिरवीगार राहतील.

संत्र्यांची साल –

फुले येण्यासाठी येईल कामी – संत्री खाल्यानंतर त्याची साल आपण काढून टाकून देतो. पण यापुढे संत्र्याची साल टाकून न देता त्याचा उपयोग झाडांना फुले यावीत म्हणून करता येईल. यासाठी संत्र्याचा स्प्रे बनवून घ्या आणि त्याची फवारणी झाडांवर करा. यामुळे झाडे ताजी राहतीलच शिवाय अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सैंधव मीठ –

सैंधव मीठ – सैंधव मिठात मॅग्नेशियम आणि सल्फरसारखे पोषक घटक असतात. झाडे हिरवीगार राहण्यासाठी सैंधव मीठ थेट मातीमध्ये मिसळावे. याने झाडांची वाढ उत्तम रित्या होईल आणि त्यात असणाऱ्या घटकांमुळे झाडांना कीड लागणार नाही.

 

 

 


हेही वाचा :  झाडांना फुलंच येत नाहीत? कुंडीत टाका या गोष्टी

 

- Advertisment -

Manini