Wednesday, February 28, 2024
घरमानिनीHealthदही आंबट होऊ नये म्हणून वापरा 'ही' ट्रिक

दही आंबट होऊ नये म्हणून वापरा ‘ही’ ट्रिक

Subscribe

आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी योग्य आणि सकस आहार घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे दह्याचं सेवन करणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. दही शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. तसेच दह्याच्या सेवनाने शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, घरी बनवलेले दही अनेकदा खूप आंबट होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरी बनवलेले दही आंबट होणार नाही.

Curd Images – Browse 418,552 Stock Photos, Vectors, And, 49% OFF

- Advertisement -
  • दही बनवण्यासाठी दूध गरम करून घ्या आणि त्यानंतर 20 मिनिटे मंद आचेवर ठेऊन आटवून घ्या. मंद आचेवर दूध उकळून घेतल्याने त्यातला ओलावा कमी होतो आणि दूध किंचित घट्ट होते. त्याने दही गोड होते.
  • अनेकजण घरात असलेले जुने दही, ताक किंवा लोण्यापासून नवीन दही बनवतात. दही सेट करण्यासाठी जुने दही किती प्रमाणत घ्यावे याची कल्पना असणे आवश्यक आहे. जुने दही दुधात प्रमाणानुसार मिसळा.
  • काहीजण खूप जास्त वेळ दूध सेट करण्यासाठी ठेवतात. गरजेपेक्षा जास्त वेळ दूध सेट झालं की दही आंबट होऊ शकते. म्हणून दही सेट होण्यासाठी 7 तासाचा वेळ जाऊ द्यावा. त्याचबरोबर दाह्यात असलेले जास्तीचे पाणी सुती कापडाने गाळून घेतल्यास दही सहज घट्ट होते.

 


हेही वाचा :

फ्रिजचा वापर न करता टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

- Advertisment -

Manini