Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyहिवाळ्यात करा हळदीच्या तेलाचा वापर; आहेत अनेक फायदे

हिवाळ्यात करा हळदीच्या तेलाचा वापर; आहेत अनेक फायदे

Subscribe

हळदीमध्ये असणारे गुणकारी तत्त्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर हळदीचे तेलही आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. त्वचेसंबंधीत आजार हळदीच्या तेलामुळे कमी होण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटी एलर्जिक, अँटी पॅरासिटिक गुण असतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळवता येते.

हळदीच्या तेलाचे फायदे

10 Benefits and Uses of Turmeric Oil | Nikura

- Advertisement -
  • कोंड्यापासून मुक्ती

हळदीच्या तेलामध्ये अँटी एलर्जिक गुणधर्म असतात. केसातील कोंडा कमी करण्यासाठी हळदीचे तेल मोठी मदत करते. हळदीच्या तेलात नारळाचे तेल मिसळून ते केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

  • पायाच्या भेगा

हिवाळ्याच्या दिवसात आपली त्वचा अधिक नाजूक होते. त्यामुळे बऱ्याचदा पायाच्या टाचेला भेगा पडतात. अशावेळी नारळाच्या तेलात हळदीच्या तेलाचे काही थेंब घालून ते पायांना लावल्यास पायांच्या भेगा कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

JS Aroma Natural Turmeric Oil, for Home Use, Feature : High In Protein, Low Cholestrol at Rs 2,250 / Kilogram in Mumbai

  • तजेलदार त्वचेसाठी

हळदीच्या तेलामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. हळदीच्या तेलामुळे त्वचेला खूप फायदे होतात. आपली त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी हळदीचे तेल उपयोगी ठरते. हळदीच्या तेलामुळे त्वचा मुलायम होते.

  • सांधेदुखी

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. ही सांधेदुखी कमी करायची असल्यास हळदीचे तेल हा एक उत्तम उपाय आहे. सांधे दुखी कमी करण्यासाठी हळदीचे तेल खूप फायदेशीर आहे. शरीराच्या ज्या भागात दुखत असेल त्या भागात हळदीचे तेल लावून त्याने मालिश करा. सांधेदुखी बरोबरच शरीराच्या संबंधित इतर आजारही कमी होण्यास मोठी मदत होती.


हेही वाचा :

द्राक्षाच्या बियांचे तेल त्वचेसाठी गुणकारी

- Advertisment -

Manini