घरलाईफस्टाईलत्वचा, केसांसाठी उपयुक्त गोष्टी

त्वचा, केसांसाठी उपयुक्त गोष्टी

Subscribe

* बदाम – यातून ‘ड’, ‘ई’ ही जीवनसत्त्वे, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम मिळते. बदामाचे तेल हे उत्तम मॉइश्चरायझर मानले जाते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो व केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

* जवसाचे तेल – यात ओमेगा ३, ओमेगा ६, ओमेगा ९ ही स्निग्धाम्ले असतात. तसेच, ‘ब’ वर्गीय जीवनसत्त्वे आढळतात. यातील क्षार व प्रथिनांमुळे कोंडा कमी होतो. त्वचेवरील सुजेसाठी हे उपयुक्त आहे.

- Advertisement -

* ऑलिव्ह ऑइल – याला बाथ ऑइल, मॉइश्चरायझर, नाईट क्रीम म्हटले जाते. अँटीऑक्सिडंट असल्याने जखमेवर उपयुक्त. ऑलिव्ह ऑइलचा आहारात नियमित वापर असावा.

* दालचिनी – यात अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल घटक असतात. त्वचा आरोग्यास उपयुक्त. दालचिनी व मधाची पेस्ट पिंपल ट्रीटमेंटसाठी वापरली जाते. दालचिनीचे तेल मसाजसाठी वापरले जाते.

- Advertisement -

* आले – यात त्वचेच्या दृष्टीने रपींळ रसशळपस गुणधर्म आढळून येतात. आले, मीठ, लिंबू यांचे ताजे मिश्रण पचनास अतिशय उपयुक्त असते. अ‍ॅसिडिटीचा त्रास असणार्‍यांनी दिवसभरात थोडे थोडे घ्यावे.

* हळद – रोजच्या आहारातील अविभाज्य घटक. थंडीत गरम दुधात घालून घ्यावी. हळद अँटी एजिंग मानली जाते. पण हळदीत अँटीऑक्सिडंटही असतात. त्यामुळे पेशींचा र्‍हास होत नाही. जखमा भरून येतात. हळदीमुळे रक्तस्रावही थांबतो. तारुण्यपिटीकांचा त्रास असणार्‍यानी हळद व चंदन लावावे.

माणूस आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. निसर्गातील विविध पाने, फळे, फुले उत्तम आरोग्यासाठी असतात. त्याचा यथायोग्य वापर करणे व निसर्गाच्या देणगीचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -