Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीAlmond Peel : बदामच नाही तर बदामाची सालही फायदेशीर

Almond Peel : बदामच नाही तर बदामाची सालही फायदेशीर

Subscribe

निरोगी शरीरासाठी दररोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदाम विविध गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे अनेकजण रोजच्या रूटीनमध्ये सकाळी पाण्य़ात अथवा दूधात भिजवलेले बदाम खातात. पण, अनेकजणांना अशी सवय असते की, बदाम खाताना त्याची साल काढून टाकतात. काही तर कचऱ्यात फेकून देतात. अशा परिस्थितीत , तुम्ही बदामाची साल फेकून न देता त्याचा वापर केसांसाठी, त्वचेसाठी, झाडांच्या खतासाठी वापरू शकता. बदामाप्रमाणे बदामाची सालही पोषकत्त्वांनी परिपूर्ण आहे. पाहूयात, बदामाच्या सालींचा वापर कसा करता येईल,

त्वचेसाठी फायदेशीर –

बहुगुणी बदामाची साल अनेकदा फेकून देण्यात येते. पण, आपण बदामाची साल फेकून देण्याऐवजी त्याचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरू शकतो. बदामाच्या सालीत असणाऱ्या गुणधर्मामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. बदामाची साली तुम्ही २ चमचे बेसनासह मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर एका बाऊलमध्ये 4 चमचे दही आणि गुलाब पाणी आणि बदामाच्या सालीची पेस्ट मिक्स करून घ्या. तयार फेस पॅक 20 ते 25 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. 20 ते 25 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. बदामाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या या फेसपॅकमुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेवरील डागही नाहीसे होतात.

झाडांसाठी फायदेशीर –

त्वचेव्यतिरिक्त तुम्ही बदामाची साल झाडांच्या पोषणासाठी वापरू शकता. बदामाच्या सालींमध्ये असणारे पोषक तत्त्वे झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात. झाडांसाठी बदामाच्या सालींचा वापर करण्याआधी त्या उन्हात वाळवून घ्याव्यात. साली पूर्णपणे उन्हात वाळल्यावर त्याची पावडर करून घ्या. तयार पावडर खतात मिक्स करून तुम्ही झाडांसाठी वापरू शकता.

केसांसाठी फायदेशीर –

व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात बदामाच्या सालीत आढळते. त्यामुळे केसांच्या विविध तक्रारी थांबवण्यासाठी बदामाची साल केसांसाठी वापरता येते. याच्या नियमित वापराने केस मऊ आणि चमकदार होतात. बदामाची सालींची पेस्ट तुम्ही केसांसाठी वापरू शकता. पेस्ट बनवण्यासाठी 1 अंड, 2 चमचे अलोवेरा जेल, 1 चमचा खोबरेल तेल आणि मध याची गरज लागेल. वरील सर्व गोष्टी एकत्र केल्यावर तयार पेस्ट अर्धातासासाठी केसांना लावून ठेवा आणि हलक्या माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini