घराची आणि बाल्कनीची शोभा वाढवण्यासाठी विविध फूलझाडे लावण्यात येतात. यात प्रामुख्याने गुलाब, जास्वंद, मोगरा अशी फूलझाडे लावून बाल्कनी सजविली जाते. शोभेसाठी वापरली जाणारी ही झाडे केवळ सौंदर्यासाठी नाही तर अनेक आजारांवर वरदान आहेत. या फूलांचा वापर योग्यरितीने केल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत मिळते. जाणून घेऊयात, फूलांचा वापर आरोग्यासाठी कसा करावा,
गुलाब (Rose)
घराच्या बालक्नीत असणारे हमखास असणारे रोप म्हणजे गुलाबाचे रोप. प्रेम व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरणारे गुलाबाचे फूल विविध आजारांवर रामबाण उपाय मानले जाते. तुम्हाला जर पोटदुखी, मळमळ, मॉर्निग सिकनेस अशा तक्रारी जाणवत असतील तर गुलाबाचे फूल त्यावर फायद्याचे ठरेल. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करुन त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. तयार पेस्ट दुधात मिक्स करावी आणि प्यावी, नक्कीच फरक जाणवेल.
झेंडू (Marigold)
झेंडूचे फूल महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्हाला मासिक पाळीशी संबंधित काही समस्या असतील तर झेंडूची फुलांचे पाणी प्यावे. झेंडूची फूले स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. काही वेळाने ते पाणी गाळून प्यावे, आराम मिळेल. याशिवाय डोळ्यांच्या संबंधित समस्या, त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी झेंडूची फूले वरदान समजली जातात.
कॅमोमाइल (Chamomile)
ताणतणावाची समस्या दूर करण्यासाठी कॅमोमाइलचा चहा प्यावा. काही दिवस दररोज या फूलाचा चहा प्यायल्याने स्ट्रेस दूर होऊन मन शांती होण्यास मदत मिळते.
जास्वंद (Hibiscus)
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्वंदाचे फूल उपयुक्त ठरेल. यासाठी जास्वदांची फुले सुकवून त्याची पावडर तयार करुन घ्यावी. याचे पाणी किंवा चहामध्ये टाकून याचा वापर तुम्हाला करता येईल.
केळफूल (Banana Flower)
केळफूल विविध आजारांवर रामबाण उपाय आहे. केळफूलाचे सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयरोग, डायबिटीस, किडनीचे आजार बरे होण्यास मदत मिळते.
पनीरफूल (Paneer Flower)
पनीरचे फूल डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर असते. पनीरफूलाच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
हेही पाहा –