स्वयंपाकघरात लिंबाचा वापर केला जातो. लिंबू पाणी तयार करण्यासाठी असो किंवा कोणत्याही भाजीत, चाटची चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर होतो. याशिवाय स्किन केअर आणि घर स्वच्छ करण्यासाठी लिंबू उपयुक्त असतो. पण, अनेकजण बहूगुणी असणाऱ्या लिंबाची साल मात्र वापरून झाले की फेकून देतात. खरं तर, या सालीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. लिंबाची ताजी साल किंवा सुकवलेली साल या दोन्हींचा वापर अनेक प्रकारे करता येतो.
लिंबाची साल पुढील पद्धतीने वापरावी –
- लिंबाच्या सालीपासून तुम्हावा क्लिनर बनवता येईल. यासाठी लिंबाच्या सालीमध्ये व्हिनेगर मिसळा, त्यात थोडे पाणी घाला आणि तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. याने तुम्ही किचन स्वच्छ करू शकता.
- स्वयंपाकघरातील चॉपिंग बॉर्ड काही काळानंतर वापरून काळा पडतो. अशावेळी तुम्ही लिंबाची साल वापरू शकता. लिंबाची साल चॉपिंग बॉर्डवर घासा. या उपायामुळे चॉपिंग बॉर्ड स्वच्छ होईल.
- कित्येकदा चहाच्या कपाला चहाचे डाग राहतात. हे डाग घालवण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी एका पातेल्यात गरम पाणी घ्यावे त्यात लिंबाच्या साली उकळवून घ्याव्यात. तयार पाण्यात कप टाका. 10 मिनीटांनी कप पुन्हा बाहेर काढा. कपावरचे डाग स्वच्छ झालेले दिसतील.
- लिंबाची साल तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवता येईल. साल ठेवल्याने फ्रीजमधील दुर्गंधी दूर होईल.
- स्टीलची भांडी चमकवण्यासाठी लिंबाच्या सालीने स्क्रब करावे आणि नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. या उपायामुळे भांडी चमकतील.
- मायक्रोवेव स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला लिंबाची साल वापरता येईल. यासाठी एका बॉऊलमध्ये लिंबाची साल घ्या आणि गरम होण्यासाठी ठेवा. यामुळे लिंबाच्या पाण्याची वाफ संपूर्ण मायक्रोवेवमध्ये पसरेल. सर्वात शेवटी एका स्वच्छ कपड्याने मायक्रोवेव पुसून घ्यावा.
- घरात जिथे मुंग्या लागल्या असतील तिथे लिंबाची साल ठेवा. लिंबाच्या वासाने मुंग्या दूर पळतील.
- तुम्हाला घरीच स्पा ट्रिटमेंट घ्यायची असेल तर आंघोळीच्या पाण्यात लिंबाची साल टाकावी. यामुळे स्किन निरोगी राहते आणि घामाची दुर्गंधी येत नाही.
- जर घरात रोपे असतील तर लिंबाची साल खत म्हणून वापरता येईल. यामुळे रोपांना पोषकतत्वे मिळतील.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पहा –
Edited By – Chaitali Shinde