निरोगी राहण्यासाठी दररोज दूध प्यावे असे सांगितले जाते. दुधात प्रोटिन्स, फॅट्स, कॅलरी, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स असतात. दुधाप्रमाणे दुधाची सायही त्वचेसाठी फायदेशीर असते. चेहऱ्यावर दुधाची साय लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी चेहऱ्याचे सौंदर्य नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी दुधाची साय वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला दुधाची साय त्वचेसाठी कशी वापरायची यासंर्दभात टिप्स सांगत आहोत.
- साय अनेक पोषकघटकांनी समृद्ध असते. साय त्वचेवर लावल्याने त्वचा हायड्रेट मॉइश्चरायझ आणि चमकते.
- ड्राय स्किनसाठी दुधाची साय वरदान समजली जाते.
- दुधात लॅक्टिक ऍसिड आढळते, जे पिंपल्स आणि त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करतात.
- नियमित चेहऱ्यावर दुधाची साय लावल्याने त्वचा मऊ होते.
- त्वचेवर टॅनिग झाले असेल तर दुधाची साय काही दिवस लावावी. या उपायाने त्वचेवरील टॅनिग दूर होण्यास मदत मिळेल.
- मुरूमांची समस्या, त्वचेवरील डाग, पिंगमेटेंशनच्या त्रासाला कंटाळले असाल तर दुधाची साय चेहऱ्यावर लावणे फायदेशीर ठरेल.
- मृत त्वचा काढण्यासाठी तुम्हाला दुधाच्या सायीचा वापर करता येईल.
- वृद्धत्वांची लक्षणे कमी करण्यासाठी दुधाची साय वापरता येईल. यातील ऍटी-ऑक्सिडंट बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करतात.
दुधाची साय चेहऱ्यासाठी कशी वापराल?
- फेशियल मास्क
- स्क्रब
चेहऱ्यावर साय कशी लावाल?
- चेहऱ्यावर साय लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्यावा.
- फ्रीजमधून काढून थंडगार साय चेहऱ्यावर लावू नये.
- साय रूम टेंमरेचरवर आणून त्यानंतर चेहऱ्यावर लावावे.
- 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर साय लावावी.
- 15 ते 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.
- मऊ टॉवेलने चेहरा पुसून घ्यावा, घासू नये.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –