हिवाळ्यात संत्री भरपूर प्रमाणात खाल्ली जातात. चवीने गोड- आंबट लागणारे हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. संत्र्याचा आस्वाद घेतल्यानंतर संत्र्याची सालं मात्र, आपण निरूपयोगी समजून फेकून देतो. पण, तुम्हाला कदाचित हे माहित नसेल संत्र्याच्या सालींचा वापर पुनर्वापर करता येतो. संत्र्याच्या सालीचा वापर त्वचेची काळजी, साफसफाई आणि स्वयंपाक घरापासून ते गार्डनपर्यत करता येतो. त्यामुळे जाणून घेऊयात, संत्र्याच्या सालीचा पुनर्वापर कसा करावा,
स्प्रे –
तुमच्या घरात मुंग्या, डास आणि झुरळ झाले असतील तर संत्र्याच्या सालींपासून तुम्हाला बग स्प्रे बनवता येईल. बग स्प्रे बनवण्यासाठी सुकवलेल्या संत्र्याची साले घ्यावी. यानंतर ही साले पाण्यात मिक्स करावी. तयार स्प्रे बाटलीत भरून ठेवा. तुमचा बग स्प्रे तयार झाला आहे.
भांडी स्वच्छ करा –
स्टेनस्टिलची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला संत्र्याची साले वापरता येतील. स्टिलच्या भांड्यावर जेथे डाग असतील तेथे संत्र्याची साले घासा. या ट्रिकने संत्र्याची साले पुन्हा नव्यासारखी चमकू लागतील.
क्लिनर –
घर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला क्लिनर तयार करता येईल. संत्र्याच्या सालींपासून तयार करण्यात आलेला स्प्रे किटाणू नष्ट करेलच शिवाय घरही सुगंधित होईल.
खत –
संत्र्याची साले खत म्हणून वापरता येतात. सालींपासून खत तयार करण्यासाठी सुकलेल्या सालांची पेस्ट तयार करून घ्यावी. यानंतर तयार पेस्ट खतात मिक्स करावी. या खतामुळे झाडांची वाढ होण्यास मदत होईल आणि किटकांचा प्रभावही कमी होईल.
केसांसाठी फायदेशीर –
खोबरेल तेलात संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करून लावल्याने केसांची समस्या दूर होते.
त्वचेसाठी फायदेशीर –
संत्र्याच्या सालीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेला फायदा होतो. हे ब्लॅक हेड्स, मुरुम आणि डागाची समस्या कमी करतात. यासाठी तुम्हाला संत्र्याची साल किंवा पावडर त्वचेवर लावायची आहे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde