Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीSacred Fig : शारीरिक व्याधींवर गुणकारी आहे पिंपळाचे पान

Sacred Fig : शारीरिक व्याधींवर गुणकारी आहे पिंपळाचे पान

Subscribe

हिंदू धर्मात वडाप्रमाणेच पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. वड-पिंपळासारखे वृक्ष पाण्याचे साठे धरून ठेवतात. त्यामुळे या झाडांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आर्युवेदानुसार, पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने अनेक शारिरीक व्याधी दूर होतात. असे देखील म्हटले जाते की, तुम्ही रोज पिंपळाच्या पानांचे सेवन केलेत तर अनेक जुनाट आजार बरे होतात. त्यामुळे जाणून घेऊयात, बहुगुणी पिंपळाच्या पानांचे फायदे

पिंपळाच्या पानांचे फायदे –

  • रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा आहारात समावेश करायला हवा.
  • आर्युवेदानुसार, पिंपळाची पानेच नव्हे तर मुळ,खोडं यांच्यातही औषधी गुणधर्म आहेत.
  • पोटाच्या समस्यावर पिंपळाचे पान गुणकारी समजले जाते.
  • तुम्हाला सतत अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यावा, नक्कीच आराम मिळेल.
  • दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी पिंपळाची पाने उपयुक्त ठरतील.
  • मुख दुर्गंधीला वैतागले असाल तर पिंपळाच्या खोडाची साल, काळी मिरीची पूड दातांना लावावी.
  • हिरड्या दुखत असतील तर पिंपळाची पाने उपयुक्त ठरतील.
  • पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते.
  • अनियमित मासिक पाळीवर घरगुती उपाय शोधत असाल तर काही दिवस नियमित पिंपळाच्या पानांचा रस प्यावा.
  • पिंपळाची पाने मधुमेह रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत, कारण पिंपळाच्या पानांचा रस दररोज प्यायल्याने रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते.
  • भरपूर उपचार करूनही खोकला जात नसेल तर पिंपळाच्या खोडांचा काढा प्यावा, आराम मिळतो.
  • सर्पदंश झाला असेल तर पिंपळाची पानांचा अर्क फायदेशीर ठरतो.
  • पिंपळाची पाने खाल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.
  • थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडतात. अशा वेळी तुम्ही पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या जागी लावावा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.
  • पिंपळाच्या पानांमुळे जखम बरी होते.
  • पिंपळाच्या पानांमध्ये ऍटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात, जे स्ट्रेस दूर करण्यासाठी फायदेशीर असतात.
  • पिंपळाची पाने सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
  • पिंपळाची साल टायफॉइडसारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरते. रुग्णाला पिंपळाच्या सालीचे चूर्ण तुम्ही देऊ शकता.
  • हार्ट अॅटॅकपासून वाचायचे असेल तर पिंपळाची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्यावे.

 

 

 

 

हेही पाहा –


 

Manini