Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल परफ्युमचा अतिवापर आरोग्यासाठी अपायकारक, होऊ शकतो कर्करोग

परफ्युमचा अतिवापर आरोग्यासाठी अपायकारक, होऊ शकतो कर्करोग

मार्केटमध्ये मिळणाऱ्या परफ्युम आणि डीयो मधे कॅन्सरसाठी कारणीभूत असणाऱे घातक घटक आढळून आले आहेत. परफ्युम तयार करतांना वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येतो.

Related Story

- Advertisement -

बाजारात अनेक प्रकारच्या परफ्युमची विक्री केली जाते अगदी महागातील महाग ब्रांन्डेड परफ्युम पासून ते स्वस्तात मिळणारे परफ्युम बाजारात सहज उपलब्ध होतात.उन्हाळा असो वा पावसाळा प्रत्येक व्यक्ती परफ्युमचा वापर करतो. पण नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार परफ्युममध्ये मानवी शरिरास हानिकारक अशी काही रसायने सापडली आहेत.

- Advertisement -

मार्केटमध्ये मिळणाऱ्या परफ्युम आणि डीयो मधे कॅन्सरसाठी कारणीभूत असणाऱे घातक घटक आढळून आले आहेत.
परफ्युम तयार करतांना वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येतो. अनेक सिंथेटीक पदार्थ मिसळले जातात .तसेच सुगंध जास्त काळ टीकून रहावा यासाठीसुद्धा अनेक क्रिया प्रक्रिया करण्यात येतात. परफ्युममध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळेअॅलर्जी होणे, हार्मोनल असंतुलन, त्वचेवर पुरळ येणे ,जळजळ होणे, कर्करोग, श्वास घेण्यास त्रास होणे या आजारांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे परफ्युम वापरणाऱ्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या आसपास वावर असणाऱ्या लोकांना देखील संभाव्य आजारास सामोरे जावे लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.सण-समारंभामध्ये नाहीच तर दररोजच्या दैनंदिन जीवनातसुद्धा परफ्युमचा सर्रास वापर केला जातो. पण क्षणभरासाठी आनंद व सुंगध देणारे हे सुंगधित पदार्थ जीवघेणे ठरत आहेत.


हे ही वाचा- सावधान! डबाबंद पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होतेय कमी

- Advertisement -