स्मार्टफोनमध्ये Oximeter App वापरताय? तत्काळ करा डिलिट, पोलिसांचा अलर्ट जारी

ऑक्सिजन पातळी तपासली जाते असे सांगून हे अँप तुमच्या फोनमधील तुमची वयक्तिक माहिती हॅक करु शकतात.

Using smartphone Oximeter App is dengerous Hack from App Cyber Criminals Delete immediately, police alert issued

कोरोनाच्या काळात लोकांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याने सतत ऑक्सिजन पातळी मोजली जात आहे. ऑक्सिजन मोजण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिमीटरची मागणी बाजारात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र अनेक जण हल्ली आल्या स्मॉर्टफोनमध्ये ऑक्सिजन पातळी मोजत आहेत. स्मॉर्टफोन ऑक्सिमीटर अँप नावाचे अनेक अँप गुगलवर उपलब्ध आहेत. हे अँप डाऊनलोड करुन त्यात ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. मात्र या अँपचा वापर करुन सायबर क्रिमिनल्स आपली फसवणूर करत असल्याचे समोर आले आहे. शरीरात फोन लाईट, कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनद्वारे ऑक्सिजन पातळी तपासली जाते असे सांगून हे अँप तुमच्या फोनमधील तुमची वयक्तिक माहिती हॅक करु शकतात. त्यामुळे तुमच्या फोनमध्येही स्मॉर्टफोन ऑक्सिमीटर अँप असेल तर ते तात्काळ डिलीट करावे. यासंबंधी पोलिसांकडून अलर्ट देखिल जारी करण्यात आला आहे.

प्ले स्टोअरवर ऑक्सिमीटर अँपच्या अनेक फेक लिंक आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही ऑक्सिमीटर अँप संदर्भात अनेक फेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. शरीरात फोन लाईट, कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनद्वारे करुन ऑक्सिजन पातळी दाखवली जाते असा दावा करुन अँप तुमच्याकडून फोनमधील फोटो, बँक डिटेल्स, फोन नंबर्स, फाईल्सचा एक्सेस मागते. खोट्या अँपशी हॅकर जोडलेले असतात. ते तुमच्या फिंगर प्रिंटच्या सहाय्याने फोन हॅक व तुमचे बँक अकाउंट हॅक करु शकतात.

गुजरात, हरियाणा सायबर क्राईमकडून अशाप्रकारच्या खोट्या ऑक्सिमीटर अँपच्या कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवून आपली फसवणूक करुन घेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे,कोणतेही अँप डाऊनलोड करण्याआधी त्याची व्यवस्थित माहिती घ्या. जर कोणत्याही प्रकारचे ऑक्सिमीटर अँप डाऊनलोड केले असेल तर त्वरित डिलीट करा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Covid-19 पासून बचावासाठी कुठे कोणता मास्क घालावा, वाचा सविस्तर