Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyसुंदर दिसण्यासाठी करा 'या' गोष्टींचा वापर

सुंदर दिसण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Subscribe

महिलांना नेहमीच सुंदर दिसण्याची आवड असते. त्यासाठी त्या अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. मात्र, या सौंदर्य प्रसाधनांमध्ये भरपूर केमिकलचा वापर केला जातो. अशावेळी कोणत्याही केमिकलचा वापर न करता तुम्ही शुद्ध आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करु शकता.

How To Look Beautiful Without Makeup - 25 Simple Natural Tips

- Advertisement -
घरगुती क्लिंजर

चार चमचे दही आणि एकदोन चमचे लिंबाचा रस एकत्र करून घ्या. कापसाच्या सहाय्याने चेहरा आणि मानेला खालून वरच्या दिशेला लावा आणि नंतर कापसाने पुसून घ्या. हे तेलकट त्वचेसाठी चांगले क्लिंजर आहे.

हँड अ‍ॅण्ड बॉडी लोशन

गुलाब जल, दोन चमचे ग्लिसरीन, अर्धा चमचा सिरका, अर्धा चमचा मध, व्यवस्थित मिक्स करून एका बाटलीत भरून ठेवा. अंघोळीनंतर हात आणि संपूर्ण शरीरावर लावा. त्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते.

- Advertisement -
हेअर डाय

1 लीटर पाण्यात आवळा 25 ग्रॅम, ब्राह्मी बुटी 55 ग्रॅम 24 तास भिजवून ठेवावे. 1 किलो तिळाच्या तेलात हे पाणी हाताने एकजीव करा आणि गाळून तेलात टाकून इतके गरम करा की पाण्याची वाफ होऊन त्यातील पाण्याचा अंश नाहीसा होईल. तेल थंड करून बाटलीत भरून ठेवा आणि केसांना लावा.


हेही वाचा  : थंडीत स्किन ड्राय झाल्यास करा ‘हा’ छोटा उपाय

- Advertisment -

Manini