घरलाईफस्टाईलउत्तराखंड

उत्तराखंड

Subscribe

’देवभूमी’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश, डोंगर-दर्‍यांनी वेधलेला, नक्कीच तुम्हाला भारावून टाकेल. निसर्ग प्रेमी असो किंवा भाविक असो, प्रत्येकासाठी काही ना काही उत्तराखंडकडे आहे.

मुंबईहून हरिद्वार एकस्प्रेस पकडून आम्ही तब्बल दीड दिवसांचा प्रवास करून तेथे पोहोचलो. हरिद्वारला उतरल्यावर विश्रांती केली. मग तिकडे आजू-बाजूला एक ते दीड तासांच्या अंतरावर खूप मंदीरे आहेत, जसे की वैष्णो देवी मंदीर, मनसा देवी, माया देवी, पवन धाम. बारा वर्षांतून एकदा होणारा कुंभ मेला प्रचलित आहे. तिकडून आमची स्वारी गेली ते रिशिकेशला. रिशिकेश हे खूप धार्मिक ठिकाण आहे. तिकडची सायंकाळची गंगा आरती अनुभवायला मिळणे म्हणजे पुण्यच लाभल्यासारखे झाले. ट्रेकिंग, रॅफटिंग आणि कॅम्पिंग अशा मनोरंजक गोष्टी ही अनुभवू शकतो.

उत्तराखंडची राजधानी देहरादून ही हिमालयांनी गुंफलेली, गंगा व यमुना नदींनी लाभलेली आहे. तिकडचे तपकेश्वर मंदीर, वन संशोधन संस्था व सहस्रधारा बघण्याची ठिकाणे आहेत. तिथून जवळच मसूरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. ६००० फुटांवर असलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य कायमस्वरूपी मनात जोपासून ठेवण्यासारखे आहे.

- Advertisement -

अगदी गारवून टाकणारा केम्पटी धबधबा आणि त्याचे भारावून टाकणारे रूप अवाढव्य होते. मॉल रोड वर शॉपिंग करायला खूप काही आहे जसे की अलंकार, थंडीचे कपडे, शॉल्स.

केदारनाथ आणि बदरीनाथ हे चार धाम पैकी दोन धाम. येथील यात्रा केल्यावर मन प्रसन्न आणि शांत होते. पुढील थंड हवेचे ठिकाण आहे नैनिताल. समुद्रतटावरून १९३८ मी. उंचीवर असलेलं हे ठिकाण नैनी लेकच्या दरीत बसलेलं आहे. नैनी लेक, नैनी शिखर, स्नो व्ह्यू, किलबरी पक्षी अभयारण्य, ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

- Advertisement -

अलमोरा हे ठिकाण हस्तकला,पाककृती आणि वन्यजीवन यांसाठी जाणलं जातं. तिथूनच जवळ असलेले ठिकाण कौसानी हे हिल स्टेशन १८९० मी. वर आहे. येथून ३५० कि.मी. हिमालयन डोंगरांचा पट्टा भव्य आहे. तेथील रूद्रधदरी धबधबा आणि गुफा व कौसानी चहाच्या बागा सुंदर आहे. शेवटी पित्तोरागड ही जागा त्याच्या देखव्या व संस्कृतीसाठी ओळखला जातो. कैलास मानसरोवर यात्रा करणारे यात्रेकरू येथे थांबून विश्रांती घेतात. ही उत्तराखंडची सफर अविस्मरणीय होती आणि तो अनुभव आयुष्यभर जोपासण्यालायक होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -