Thursday, April 25, 2024
घरमानिनीयोनीच्या 'या' गुजगोष्टी प्रत्येक महिलेला माहीतच हव्यात

योनीच्या ‘या’ गुजगोष्टी प्रत्येक महिलेला माहीतच हव्यात

Subscribe

महिलांनी आपल्या शरिरावरच्या अन्य अवयवांप्रमाणेच आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. अशातच तुम्हाला तुमच्या वजाइना म्हणजेच योनी बद्दलच्या काही गोष्टी माहिती असणे फार आवश्यक असते. पुढील काही गोष्टी या महिलांना जरुर माहिती पाहिजेत.

-योनीतून येणारी दुर्गंधी

- Advertisement -


बहुतांश महिलांच्या योनीतून दुर्गंधी येते. यामुळे चिंतेत पडण्याची काहीच गरज नाही. असे काहीवेळा अशा कारणास्तव होते जेव्हा तुमच्या शरिरातून घाम आणि योनीतून डिस्चार्ज होत असतो.

-सफेद डिस्चार्ज

- Advertisement -


बहुतांश महिलांना सफेद डिस्चार्जचा सामना करावा लागतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे तुम्हाला वजाइनल इंन्फेक्शन होत नाही. जर डिस्जार्च अधिक असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

-स्पॉटिंग


मासिक पाळीपूर्वी तुम्हाला किंवा नंतर हलके ब्लिडिंग होत असेल तर त्याला स्पॉटिंग असे म्हटले जाते. या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. कारण असे होणे एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात.

-योनीत कोरडेपणा येणे


योनीत कोरडेपणा येण्याची समस्या बहुतांश महिलांना होते. याकडे ही दुर्लक्ष करु नका. यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

-जळजळ आणि खाज येणे


जर तुमच्या योनीत जळजळ आणि खाज येण्याची समस्या येत असेल तरीही वेळीच काळजी घ्या. कारण असे करणे धोकादायक ठरु शकते.

-योनीच्या स्वच्छतेसाठी साबण


वजाइना स्वच्छ करण्यासाठी कठोर आणि सुगंधित साबणाचा वापर करु नये. यामुळे समस्या उद्भवू शकते.

-प्युबिक हेअर


प्युबिक हेअर शेव केल्यास इंन्फेक्शन होण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला तुमची योनी स्वच्छ ठेवायची असेल तर प्युबिक हेअर शेव करण्याऐवजी ते ट्रिम करा.

 


हेही वाचा- सॅनिटरी पॅड dispose कसे कराल…

 

- Advertisment -

Manini