प्रत्येक जोडप्यांसाठी व्हॅलेंटाइन डे खूप खास असतो. दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या दिवशी जोडीदारासाठी काहीतरी खास करतात आणि एकमेकांना प्रपोज देखील करतात. बरेच लोक या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला जातात. जर तुम्हाला एलिगंट आणि सुंदर लूक पाहिजे असेल तर तुम्ही काही सुंदर रेड ड्रेसची निवड करू शकता. आज आपण जाणून घेऊयात व्हॅलेंटाइन डे ला कोणता रेड ड्रेस घालू शकतो.
रेड सैटन ऑफ शोल्डर ड्रेस
तुम्ही व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने रेड सैटन ऑफ शोल्डर ड्रेस घालू शकता. हा ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक वाटेल. या ड्रेससह तुम्ही काही ऍक्सेसरीज देखील स्टाइल करू शकता. तसेच न्यूड किंवा रेड हिल्स उत्तम पर्याय आहे.
पफ स्लीव्स ड्रेस
जर तुम्ही या दिवशी डिनर डेटला जात असाल तर पफ स्लीव्स ड्रेस उत्तम आहे. या ड्रेसमध्ये तुम्हाला अनेक रंग आणि प्रकार देखील सहजपणे मिळतील. हा ड्रेस तुम्हाला कोणत्याही ठिकाणी सहजपणे मिळेल.
सिक्विन वर्क ड्रेस
जर तुम्हाला काही हटके आणि ग्लॅमरस असं काही वेअर करायचं असेल तर तुम्ही सिक्विन वर्क ड्रेस निश्चितपणे घालू शकता. हा ड्रेस तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी घेऊ शकता. हा ड्रेस तुम्हाला साधारणपणे 1००० ते 2००० पर्यत मिळेल.
वेलवेट ड्रेस
सध्या वेलवेट ड्रेस खूप ट्रेंडमध्ये आहे. या वेलवेटमध्ये तुम्हाला खूप सुंदर आणि आकर्षक असे ड्रेस सहजपणे मिळेतील.
ग्लिटर ड्रेस
या दिवशी तुम्ही कुठे पार्टीला जाणार असाल तर ग्लिटर ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. या ड्रेसमुळे तुम्हाला ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक मिळेल. व्हॅलेंटाइन डे साठी हा ड्रेस बेस्ट आहे. या ड्रेसेवर तुम्ही ऍक्सेसरीज देखील घालू शकता .
महत्वाच्या टिप्स
- कॅज्युअल आणि स्टायलिश लूकसाठी रेड मिडी ड्रेस किंवा को-ऑर्ड सेट बेस्ट ऑप्शन आहे.
- ऍक्सेसरीजमध्ये गोल्ड किंवा सिल्व्हर ज्वेलरी, न्यूड किंवा रेड हिल्स आणि मिनिमल मेकअप हा लूक कम्प्लीट करू शकतो.
- रेड ड्रेससह मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट हिल्स देखील घालू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : व्हाइट जीन्ससाठी बेस्ट फ्रॉक स्टाइल टॉप ऑप्शन्स
Edited By : Prachi Manjrekar