Sunday, February 9, 2025
HomeमानिनीValentine Day Fashion Tips : व्हॅलेंटाइन डे ला स्टाइल करा हे प्रिटी...

Valentine Day Fashion Tips : व्हॅलेंटाइन डे ला स्टाइल करा हे प्रिटी पिंक ड्रेसेस

Subscribe

फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. या महिन्याला प्रेमाचा महिना देखील म्हणतात. या महिन्यात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो, त्याचप्रमाणे संपूर्ण आठवडाभर व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. या वीकदरम्यान दररोज वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. प्रेमिकांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. या दिवसांमध्ये ते त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला खास भेटवस्तू देतात. याशिवाय डिनर डेट, सरप्राईज प्लॅन किंवा सरप्राईज गिफ्टसने हा महिना भरलेला असतो. तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याची ही एक उत्तम संधी असते. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराला ग्लॅमरस आउटफिटने इम्प्रेस देखील करू शकता. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीक किंवा त्या खास दिवशी तुमच्या जोडीदारासोबत डेट नाईटवर जाण्याचा विचार करत असाल तर आजच्या या लेखातून जाणून घेऊयात काही वेगळ्या स्टाईलचे सुंदर गुलाबी ड्रेसेसचे कलेक्शन. जे व्हॅलेंटाइन डे साठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. प्रेमातील गोडगुलाबी दिवसांसाठी गुलाबी ड्रेस हा सुंदर पर्याय आहे. हे ड्रेसेस परिधान केल्यानंतर तुमचा लूक ग्रेसफुल आणि स्टायलिश दिसेल.

सिक्विन वर्क ट्यूब ड्रेस 

Valentine Day Fashion Tips  व्हॅलेंटाइन डे ला स्टाइल करा हे प्रिटी पिंक ड्रेसेस
सिक्विन वर्क ट्यूब ड्रेस (Image Source : Social Media)

सिक्विन वर्क ट्यूब ड्रेस हा एक सुंदर ऑप्शन ठरू शकतो. डेट नाईट आणि पार्ट्यांमध्ये असे कपडे ग्लॅमरस लूक देतात. यावर तु्म्ही ग्लॉसी मेकअप आणि मोकळे कुरळे केस असा लूक क्रिएट करू शकता. जो तुम्हाला इतरांपेक्षा उठावदार दाखवू शकेल. यासोबतच सिल्व्हर रंगाचे स्टोन इअररिंग्स तुमचा लूक पार्टी परफेक्ट करतील. तुम्ही ट्यूब नेकलाइन ड्रेससोबत पेंडंट नेकलेस पेअर करू शकता. गुलाबी ड्रेससोबत सिल्व्हर कलरची हिल्स मॅच होऊ शकेल.

पफ स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस

Valentine Day Fashion Tips  व्हॅलेंटाइन डे ला स्टाइल करा हे प्रिटी पिंक ड्रेसेस
पफ स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस (Image Source : Social Media)

जर तुमची फिगर कर्व्ही असेल तर तुम्ही बॉडीकॉन ड्रेसची स्टाइल करू शकता . या ड्रेसच्या स्लीव्हजला पफ लूक देण्यात आला असेल तर अधिक उत्तम. यामध्ये तुमचा लूक खूप स्टायलिश दिस शकेल.मखमली कानातले या ड्रेससह सर्वोत्तम जुळतात. नेकलेसमध्ये फंकी ज्वेलरी कॅरी करू शकता. तुम्ही हेअरस्टाईलला समोरून पफ आणि मागच्या बाजूला कर्ल लूक देऊ शकता. या ड्रेससोबत पिंक हिल्स मॅच केल्याने तुम्हाला क्लासी लूक मिळेल.

कोल्ड शोल्डर ड्रेस

Valentine Day Fashion Tips  व्हॅलेंटाइन डे ला स्टाइल करा हे प्रिटी पिंक ड्रेसेस
कोल्ड शोल्डर ड्रेस (Image Source : Social Media)

डेट नाईटला तुमचा पार्टनर तुमच्याकडे पाहत राहावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही गुलाबी रंगाचा फ्रिल ड्रेस निवडू शकता. असे कपडे परिधान केल्याने क्लासी लूक येतो. या ड्रेससोबत स्टोन चोकर नेकलेस कॅरी करूनही तुम्ही स्मार्ट दिसू शकाल. हेअर स्टाइलमध्ये तुम्ही पोनी लूकसोबत फ्रंट फ्लिक लूक देऊ शकता. या ड्रेससोबत सिक्विन वर्क हिल्स उत्तम असतील.

हेही वाचा : Cleaning Tips : खराब फॅन असा होईल स्वच्छ


Edited By – Tanvi Gundaye

Manini