व्हॅलेंटाईन डे स्पेशल: रसगुलाब केक

Valentine day special: How to make rasgulla cake
व्हॅलेंटाईन डे स्पेशल: रसगुलाब केक

केकशी केलेलं फ्युझन म्हणजे रसगुलाब केक. आज आपण ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने रसगुलाब केकची खास रेसीपी पाहणार आहोत.

कृती 

मैदा २०० ग्रॅम, रसमलाई आणि गुलामजाम, कॉर्न फ्लॉवर २० ग्रॅम, वेलची पावडर अर्धा टीस्पून, चिमूटभर मीठ, बेकिंग पावडर अर्धा टीस्पून, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून, साखर १२५ ग्रॅम, सूर्यफुलाचे तेल १२० मिली, दूध २४० मिली, व्हिनेगर १ टेबलस्पून, रसमलाई इसेन्स अर्धा टीस्पून, रोझ इसेन्स अर्धा टीस्पून, चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग, व्हिपिंग क्रीम २५० ग्रॅम, सजवाटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप

साहित्य 

सर्वप्रथम ओव्हन १६० दहा मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्या. त्यानंतर मैदा, कॉर्न फ्लॉवर, बेकिंग पावडर आणि वेलची पावडर एकत्र करून चाळून घ्या. मग तेल, दूध आणि साखर एका भांड्यात एकत्रित करा. या मिश्रणात व्हिनेगर आणि रसमलाई इसेन्स, खाण्याचा रंग घालून एकत्र करा. मग या सर्व मिश्रणात चाळलेले पीठ हळूहळू घाला. त्यानंतर केकचं भाडं घेऊन त्यात तुपाचा हात लावून घ्या. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओता. मग त्यानंतर १६० अंशावर ओव्हनमध्ये ३० ते ३५ मिनिटं बेक करण्यासाठी ठेवा. केक बेक झाल्यानंतर थंड करून त्याचे दोन आडवे भाग करा. आयसिंग करण्यासाठी व्हिपिंग क्रीममध्ये रसमलाईचे दोन टीस्पून, दूध, खाण्याचा रंग आणि रोझ इसेन्स टाकून हे मिश्रण फेटून घ्या. त्यानंतर केकवर थोडं रसमलाईचं दूध घालून स्पाँज थोडा ओला करा. मग त्यावर रसमलाई आणि गुलामजामचे बारीक तुकडे करून पसरा. त्यानंतर त्यावरून व्हीप्ड क्रीम टाका. त्यावर केकचा दुसरा भाग ठेवून तुमच्या आवडीप्रमाणे क्रीम लावा. हे सर्व झाल्यानंतर गुलाबजाम आणि रसमलाईचा वापर करून सजावट करा. मग हा केक तीन ते चार तास सेट होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवा.


हेही वाचा – खमंग मेथी मटर मलाई