Vastu Shastra : धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोणातून ‘या’ दिशेला डोके करून झोपल्याने भोगावे लागतात गंभीर परिणाम

आपण कशाप्रकारे झोपतो यावर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी जोडलेल्या असतात. चुकिच्या दिशेकडे डोके करून झोपल्याने तुमचे आरोग्य देखील खराब होऊ शकेत

सुदृढ शरीरासाठी आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणं सुद्धा तितकचं महत्वाचे आहे. दिवसभर काम केल्यामुळे अनेकजण खूप धकलेले असतात, अशातच ते कसेही आणि कोणत्याही दिशेला डोके करून झोपतात, मात्र हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक सिद्ध होऊ शकते. आपण दररोज कोणत्या दिशेला डोके करून झोपावे याबाबत आपल्या हिंदू शास्त्रात तसेच विज्ञानातही खूप सखोल माहिती दिलेली आहे. आपण कशाप्रकारे झोपतो यावर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी जोडलेल्या असतात. चुकिच्या दिशेकडे डोके करून झोपल्याने तुमचे आरोग्य देखील खराब होऊ शकेत.

तुम्ही कोणत्या दिशेकडे डोके करून झोपता?

 • पूर्वेकडे डोके करून झोपल्याने
  पूर्व दिशेला शास्त्रात देवी-देवतांची दिशा मानन्यात आले आहे. त्यामुळे या दिशेला डोके करून झोपल्याने तुम्हाला देवी-देवतांचा आर्शिवाद प्राप्त होतो. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी नेहमी पूर्वेकडेच डोके करून झोपावे,यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. मात्र झोपताना कधीही पूर्वेकडे पाय करू नये. हे शास्त्रात अशुभ मानलेले आहे.
 • दक्षिणेकेडे डोके करून झोपल्याने
  वास्तू शास्त्रानुसार दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने सर्वात उत्तम मानले जाते. असं म्हणतात की, दक्षिणेला डोके करून झोपने तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. तसेच तुम्हाला कोणत्याही मानसिक समस्येचा सामना करावा लागत नाही. मात्र दक्षिणेकडे चुकूनही पाय करून झोपू नये. कारण हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून हानिकारक मानले जाते. तसेच शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. असं मानले जाते की, दक्षिणेला डोके करून झोपल्याने चुंबकीय शक्ती पायांमध्ये प्रवेश करते, ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही.

शास्त्रात आणि विज्ञानात केवळ पूर्व आणि दक्षिणेकडे डोके करून झोपावे असा सल्ला देण्यात आहे. चुकूनही कधी उत्तर आणि पश्चिमेकडे डोके करून झोपू नये. कारण हे तुमच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक सिद्धा होऊ शकतं.

झोपेशी काही संबंधीत गोष्टी

 • शास्त्रांच्या माहितीनुसार, संध्याकाळच्या वेळी कधीही घरामध्ये झोपू नये.
 • विज्ञानानुसार झोपण्याच्या जवळपास दोन तास आधी जेवावे.
 • झोपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ करावे.
 • झोपण्याआधी मन शांत करुन देवाचे ध्यान करावे.
 • विणाकारण रात्री जास्त वेळ जागू नका.

हेही वाचा :Vastu Tips : घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…