Wednesday, April 17, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : घरामध्ये मातीच्या 'या' वस्तू ठेवल्याने होतो भाग्योदय

Vastu Tips : घरामध्ये मातीच्या ‘या’ वस्तू ठेवल्याने होतो भाग्योदय

Subscribe

वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे एक वेगळे महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये पूजा-पाठ करताना तांबे-पितळेसोबतच मातीचा देखील वापर केला जातो. यामध्ये मातीच्या पणत्या, देवीची मूर्ती आणि इतर भांडी देखील. शास्त्रामध्ये मातीपासून तयार केलेल्या भांड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. असं म्हणतात की, मातीच्या भांड्यांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

सुख-समृद्धीसाठी करा मातीच्या भांड्यांचा वापर

- Advertisement -

मातीचा घडा


अनेकजण उन्हाळ्यात पाणी थंड पिण्यासाठी मातीच्या घड्याचा वापर करतात. हे आरोग्यासाठी उत्तम आहे आणि वास्तूनुसार देखील शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रामध्ये मातीचा घडा उत्तर दिशाला ठेवण शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. परंतु हा घडा नेहमी पाण्याने भरलेला असावा.

- Advertisement -

मातीची कुंडी


अलीकडे लोक घरामध्ये प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंडीमध्ये झाडं लावतात. परंतु वास्तू शास्त्रात मातीची कुंडी शुभ मानली जाते.

मातीच्या पणत्या


शास्त्रात मातीच्या पणत्यांचे विशेष महत्व आहे. मातीच्या पणत्यांमध्ये दीवा प्रज्वलित केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

मातीची मूर्ती


वास्तू शास्त्रामध्ये मातीच्या मूर्तीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. घरातील मंदिरामध्ये देवी लक्ष्मींची मातीची मूर्ती ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते.

 

 


हेही वाचा :

Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार देवघर कोणत्या दिशेला असायला हवे?

- Advertisment -

Manini