Sunday, February 16, 2025
HomeमानिनीVastu Tips : भरभराटीसाठी वास्तुशास्त्रानुसार असावी बाल्कनी

Vastu Tips : भरभराटीसाठी वास्तुशास्त्रानुसार असावी बाल्कनी

Subscribe

वास्तुशास्त्रानुसार घरातील बाल्कनीला खूप खास स्थान आहे. तुमच्या घराच्या सुख-समृद्धीसाठी बाल्कनी स्वच्छ आणि सुंदर असणे खूप महत्त्वाचे मानले जाते. काही घरांमध्ये अनेकदा लोक अनावश्यक किंवा वापरात नसलेल्या वस्तू बाल्कनीत फेकत असल्याचे दिसून येते. वास्तुशास्त्रानुसार असं करणे अत्यंत दोषपूर्ण मानले जाते. जर तुमची बाल्कनी देखील अनावश्यक वस्तूंनी भरलेली असेल तर त्या सगळ्या वस्तू घराबाहेर फेकून द्या. आज आपण जाणून घेऊयात काही अशा टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची बाल्कनी वास्तुशास्त्रानुसार सुशोभित करू शकता.

बाल्कनीची दिशा :

बाल्कनीसाठी सर्वोत्तम दिशा पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व या समजण्यात आल्या आहेत. सकाळ आणि दुपारचा सूर्यप्रकाश या दिशांना येतो, जो आपल्यासाठी फायदेशीर असतो आणि यामुळे सकारात्मक ऊर्जा घरी येते. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बाल्कनी असणे चांगले मानले जात नाही. जर तुमच्या घरात ही परिस्थिती असेल तर त्या बाल्कनीच्या विरुद्ध बाजूला तितकीच मोठी बाल्कनी असावी.

Vastu Tips Balcony should be according to Vastu Shastra for prosperity

बाल्कनीचे छत :

वास्तूनुसार बाल्कनीचे छत उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे झुकलेले असावे. बाल्कनीचे छप्पर घराच्या उर्वरित छतापेक्षा थोडेसे कमी असावे. असे केल्याने, नैसर्गिक प्रकाश दिवसभर कोणत्याही व्यत्ययाशिवाय घरात येतो. एस्बेस्टोस किंवा कथील यांसारखी सामग्री छप्पर घालण्यासाठी वापरली जाऊ नये कारण ते उष्णता आणि ऊर्जा शोषून घेतात.

बाल्कनीमध्ये रंगांचा वापर :

गुलाबी, निळा, बेज आणि पांढरा असे हलके रंग बाल्कनीसाठी योग्य आहेत. पांढरा रंग प्रकाश प्रतिबिंबित करतो आणि सकारात्मक उर्जेचे स्वागत करतो. हलका हिरवा रंगही वापरता येतो. गडद रंग टाळावेत. बाल्कनी स्वच्छ आणि चमकदार असणे खूप महत्वाचे आहे.

बाल्कनीत वास्तूनुसार फर्निचर :

बाल्कनीमध्ये आराम करण्यासाठी काही फर्निचर असणे महत्वाचे आहे. वास्तूनुसार बाल्कनीच्या दक्षिण कोपऱ्यात दोन खुर्च्या आणि एक लहान टेबल ठेवता येते. फर्निचर पश्चिम दिशेला देखील ठेवू शकता, जेणेकरून तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल. मोठे आणि जड फर्निचर टाळावे कारण ते सूर्यप्रकाश घरात जाण्यापासून रोखू शकतात.

Vastu Tips Balcony should be according to Vastu Shastra for prosperity

बाल्कनीमध्ये झोपाळा :

बाल्कनीत झोपाळा उत्तर किंवा दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे तुम्ही आरामात वेळ घालवू शकता. एक सुंदर आणि आरामदायी झोपाळ्यामुळे बाल्कनीचे सौंदर्य अधिक वाढू शकते. आजकाल बाल्कनीमध्ये झोपाळा ठेवण्याचा ट्रेंड खूप जोरात आहे, परंतु लक्षात ठेवा की हा झोपाळा अतिशय स्वच्छ असावा आणि आवाज न करणारा असावा.

वास्तूनुसार बाल्कनीतील झाडे :

वास्तुशास्त्रानुसार, वनस्पती कोणत्याही ठिकाणी उपस्थित असलेली ऊर्जा वाढवतात. बाल्कनीच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला रोपे लावावीत. येथे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.
पश्चिम आणि दक्षिण भिंतींवर वर्टिकल गार्डन बनवता येऊ शकतात. खूप उंच झाडे आणि वेली टाळल्या पाहिजेत. रंगीत फुलांची भांडी सर्व प्रकारच्या बाल्कनींसाठी योग्य ठरू शकतात.

बाल्कनीमध्ये दिवे वापरणे :

वास्तूनुसार अंधाऱ्या बाल्कनीत बसू नये. हे अशुभ मानले जाते. बाल्कनीमध्ये मंद प्रकाश वापरा. यामुळे एक शांत आणि सकारात्मक वातावरण तयार होऊ शकेल. अंधुक प्रकाश असलेल्या बाल्कनीत बसल्याने तुमचे मन शांत आणि सकारात्मक राहते.

हेही वाचा : Shah Rukh Khan : इंस्टाग्रामवर SRK ला इन्फ्लुएंसरकडून धोबीपछाड, नेमकं प्रकरण काय?


Edited By – Tanvi Gundaye

Manini