अशी अनेक झाडेझुडपे आहेत जी घरात लावली तर सकारात्मक परिणाम मिळू शकतात. म्हणूनच घरात तुळस, मनीप्लांट यासारखी झाडे लावली जातात. ज्याचे अनेकविध लाभ आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात शमीची वनस्पती ही शनिदेव आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित मानली जाते. तसेच ही वनस्पती वास्तूच्या दृष्टीकोनातून देखील खूप शुभ समजली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही याच्याशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला याचे अनेक फायदे मिळू शकतील आणि काही समस्यांपासून सुटकाही मिळू शकेल. जाणून घेऊयात शमीचे रोप घरात लावल्याने नेमका काय लाभ होऊ शकतो याबद्दल.
मिळतील हे फायदे :
जर तुम्ही घरामध्ये शमीचे रोप लावले आणि त्याची नियमित पूजा केली तर भगवान शिवासोबतच तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वादही लाभतो. याशिवाय कुंडलीत आढळणाऱ्या अशुभ ग्रहांचा प्रभावही टाळता येतो. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल तर त्याने आपल्या घरात शमीचे रोप लावावे. असे केल्याने तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. एवढंच नाही तर घरात शमीचे रोप लावल्याने वैवाहिक जीवनातील अडथळ्यांपासून देखील मुक्ती मिळू शकते.
हे उपाय करा :
शिवलिंगावर शमीची पानेही अर्पण करावीत. यामुळे जीवनातील संकटे दूर होतात. घरात सुखसमृद्धी येते आणि पैशाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यासोबतच दर शनिवारी शमीच्या झाडाची पूजा करून त्याखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने शनिदशेचा प्रभाव कमी होतो.
कुठे लावावे ?
वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप घरामध्ये कधीही लावू नये. आपण ते घराच्या बाल्कनीवर किंवा टेरेसवर लावू शकता. यासोबतच शमीचे रोप लावण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम मानली जाते. शनिदेवाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी हे रोप लावल्यास तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतात. या वनस्पतीवर थेट सूर्यप्रकाश पडू नये याचीदेखील विशेष काळजी घ्या.
हेही वाचा : Deepali Sayyed : दीपाली सय्यदची नवी सुरुवात, सुरू केलं नवं हॉटेल
Edited By – Tanvi Gundaye