Vastu Tips : घरात सतत आजारपण सुरु आहे? ‘हे’ वास्तू दोष आजचं करा दूर

नेहमी निरोगी राहणं हीच आयुष्यातील सर्वाद मोठी संपदा आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रुपाने सक्षम असणं सुदृढ असण्याचं लक्षण आहे. अलीकडच्या बदलत्या लाईफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे अनेक लोकांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक रुपाने फिट राहण्यासाठी आपण अॅलोपॅथी होमिओपॅथीची किंवा आयुर्वेदाचा आधार घेतो. मात्र, कधी कधी या सर्व उपचारांचा देखील काहीच परिणाम होत नाही. अशावेळी आपल्या राहत्या घरात वास्तू दोष असल्याचं देखील म्हटलं जातं.

कधी कधी घरात मोठ्या प्रमाणात वास्तू दोष असल्यामुळे देखील अनेकांना आजारांचा सामना करावा लागतो. घरातील प्रत्येक दिशेचा तसेच घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या आरोग्य, सुख-समृद्धी, आर्थिक परिस्थितीशी संबंध असतो.

‘या’ गोष्टींमुळे घरामध्ये निर्माण होऊ शकतो वास्तू दोष

  • स्वयंपाक घराची दिशा नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावी. तसेच स्वयंपाक घरात कधीही आग आणि पाणी एकत्र ठेऊ नये. असं केल्यास घरातील सदस्यांना पोटासंबंधी आजार निर्माण होतात.
  • स्वयंपाक घरात रात्री खरकटी भांडी ठेऊ नये.
  • स्वयंपाक घरात जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा.
  • रात्री झोपताना तुमचं डोकं नेहमी उत्तर दिशेला आणि पाय दक्षिणेला असल्यास डोकेदुखी, निद्रानाश अशा समस्या निर्माण होतात.
  • गर्भवती स्त्रियांनी कधीही पूर्वोत्तर दिशेला झोपू नये, यामुळे गर्भाशयासंबंधित समस्या निर्माण होतात.
  • घरामध्ये जुन्या, वापरात नसलेल्या वस्तू ठेऊ नये.
  • घराचे प्रवेश दार स्वच्छ आणि सुंदर ठेवावे.
  • घरात रोज सकाळ-संध्याकाळ कापूर, धूप-दीप लावावे.

 


हेही वाचा :

Hindu Shastra : देवघरातील ‘या’ ३ गोष्टी मानल्या जातात अशुभ