घरात पाळीव प्राणी ठेवल्यास घरात सकारात्मकता आणि आनंद येतो. घराच्या आजूबाजूला सकारात्मक माहोल बनवण्याव्यतिरिक्त भावनिक संतुलनही बनण्यात मदत होते. घरात प्राणी आणि पक्षी आणल्याने होणारे लाभ मिळवण्यासाठी वास्तूशास्त्राच्या काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर त्यांचे पालन केले गेले तर केवळ घरातील सदस्यांसाठीच नव्हे तर पाळीव प्राण्यांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊयात काही वास्तू टिप्स ज्या पाळीव प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या वास्तूसाठी सहायक ठरू शकतात.
घरात पाळीव प्राण्यांना उत्तर किंवा पश्चिम दिशेला स्थान द्या. दक्षिण किंवा आग्नेय दिशेला पाळीव प्राणी ठेवल्यास ते आक्रमक होतात.
कुत्रा :
कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. त्याला माणसाचा चांगला मित्र समजले जाते. कुत्र्याला पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणे आणि त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. कुत्र्याला उत्तर दिशेला तोंड असलेल्या बंदिस्त जागेमध्ये ठेवावे. जर तुमचा बंगला असेल तर तुम्ही कुत्र्याचे घर प्रवेशद्वाराजवळ ठेवा.
लव्हबर्डस :
पक्षी निरोगी राहण्यासाठी पक्ष्यांचा पिंजरा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावा. पाळीव पक्ष्यांना पुरेसा प्रकाश, मोकळी जागा आणि ताजी हवा मिळू शकेल असे पाहावे.
मासे :
वास्तुशास्त्रानुसार, मासे त्याच्या मालकांना धन, संपत्ती आणि उत्तम आरोग्य देतात. जर तुमच्या घरी फिशटँक असेल तर ते उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावे.
कासव :
पाळीव प्राणी म्हणून कासव हाही एक लोकप्रिय प्राणी आहे. कासव हे संपत्तीचे प्रतीक आहेत. त्यांचा संबंध सौभाग्य , संपत्ती आणि समृद्धीशी जोडलेला आहे. कासवांना नेहमी उत्तर दिशेला असलेल्या मत्स्यालयामध्ये ठेवावे.
बेडूक :
बेडकांना अनेकदा पाळीव प्राणी समजलं जात नाही. तरीही त्यांच्याशी निगडीत वास्तू टिप्स समजून घ्यायला हव्यात. बेडूक हे अनेकदा शुभ समजले जातात. बेडकांना वास्तूशास्त्रानुसार मोकळ्या हवेत भटकण्याची मुभा द्यावी.
गाय :
हिंदू धर्मानुसार, गायीला खूप महत्त्व आहे. गायीचे दूध, मूत्र, शेण या सर्वांचे औषधी फायदेही भरपूर आहेत. तुमच्याकडे पाळीव प्राणी असल्यास त्यांना नेहमी पूर्व किंवा वायव्य दिशेला ठेवावे.
हेही वाचा : Diwali 2024 : दिवाळीत धनलाभासाठी लावा ही झाडे
Edited By – Tanvi Gundaye