घरभक्तीVastu Tips : फिश एक्वेरियममधील 'या' रंगाचा मासा करेल तुमच्या घरातील नकारात्मकता...

Vastu Tips : फिश एक्वेरियममधील ‘या’ रंगाचा मासा करेल तुमच्या घरातील नकारात्मकता दूर

Subscribe

अगदी पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा मास्यांना देव स्वरुप मानलेल आहे. त्यामुळे आपल्या घरातसुद्धा फिश एक्वेरियम ठेवणे खूप लाभकारी आहे.

वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये आणि व्यापाराच्या ठिकाणी फिश एक्वेरियम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की, भगवान विष्णूंचा पहिला अवतार हा मस्य अवतार होता. त्यामुळे अगदी पौराणिक ग्रंथांमध्येसुद्धा माशांना देव स्वरुप मानलेलं आहे. त्यामुळे आपल्या घरातसुद्धा फिश एक्वेरियम ठेवणे खूप लाभकारी आहे. इतकंच नव्हे तर, फिश एक्वेरियममधील मासे तुमच्या घरात आणि व्यापारात सकारात्मकता वाढवण्यासाठी तसेच कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी मदत करतात. रंगबेरंगी माशांचा फिश एक्वेरियम आपल्या घराची शोभा वाढवतो, शिवाय घरातील नकारात्मकतासुद्धा दूर करतो. परंतु फिश एक्वेरियम ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी.

- Advertisement -

 

१. वास्तू शास्त्रानुसार फिश एक्वेरियम तुमच्या घरात ठेवण्याआधी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे फिश एक्वेरियममध्ये माशांची संख्या नेहमी ९ असणं आवश्यक आहे.

- Advertisement -

२. धनलाभासाठी आणि कुटुंबातीच्या सुख-समृद्धीसाठी तसेच घरावर येणारी संकट टाळण्यासाठी घरात फिश एक्वेरियम ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं.

३. वास्तू शास्त्रानुसार वैवाहिक जीवन सुखकर बनवण्यासाठी घराच्या मुख्य दाराच्या डाव्या बाजूला फिश एक्वेरियम ठेवावे.

४. वास्तू शास्त्रानुसार असं देखील सांगण्यात आलं आहे की, फिश एक्वेरियम कधीही तुमच्या स्वयंपाक घरात किंवा बेडरूममध्ये ठेवू नये, यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता पसरू शकते. तसेच घरातील सकारात्मक ऊर्जेची वाढ होण्यासाठी फिश एक्वेरियममधील पाणी नियमित बदलायला हवं.

५. घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरातील फिश एक्वेरियममध्ये ९ मासे ठेवावे, तसेच त्यातील एक मासा काळ्या रंगाचा असावा. यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणाची वाईट नजर पडणार नाही.


हेही वाचा : Vastu Tips : घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -