घरभक्तीVastu Tips : घरातील झाडूबाबत पाळा 'हे' ७ नियम नाहीतर; देवी लक्ष्मी...

Vastu Tips : घरातील झाडूबाबत पाळा ‘हे’ ७ नियम नाहीतर; देवी लक्ष्मी होईल तुमच्यावर नाराज

Subscribe

आपल्याकडे हिंदू धर्मात झाडूला साक्षात देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दिवाळीत लक्ष्मी पुजन करताना सुद्धा आपण देवी लक्ष्मी बरोबरचं झाडूचे देखील पुजन करतो. त्यामुळेच झाडूचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशी जोडलेला आहे.

वास्तू शास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जेमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. जेव्हा घरात आनंदाचे वातावरण असते. तेव्हा घरातील व्यक्तींचे यशाचे मार्ग मोकळे होतात. शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या देवी लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत. आपल्याकडून कधी कधी नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. ज्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

घरातील घाण-धूळ साफ करण्यासाठी आपण झाडूचा वापर करतो, आपल्याकडे हिंदू धर्मात झाडूला साक्षात देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दिवाळीत लक्ष्मी पूजन करतानासुद्धा आपण देवी लक्ष्मी बरोबरच झाडूचे देखील पूजन करतो. त्यामुळेच झाडूचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशी जोडलेला आहे. असं म्हणतात की, जे घर नेहमी स्वच्छ साफ केलेले असते, तिथेच देवी लक्ष्मी वास करते. त्यामुळेच शास्त्रात झाडूच्या वापराचे काही योग्य नियम सांगण्यात आले आहेत. जेणेकरून तुमच्या घरात नेहमी सुख-समृद्धी आणि आनंद वास करेल.

- Advertisement -

झाडूच्या वापराचे योग्य नियम
१. शास्त्रात झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे झाडूला कधीही जोरात आपटू नये किंवा फेकू नये, असं केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो.

२. शास्त्रामध्ये घराच्या साफ-सफाईला विशेष महत्त्व देण्यात आले आहे, परंतु शास्त्रामध्ये संध्याकाळनंतर घरात झाडू मारण्यास किंवा साफ-सफाई करण्यास मज्जाव केला आहे. वास्तू शास्त्रानुसार संध्याकाळनंतर घरात झाडू मारल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. ज्यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट उद्भवू शकते.

- Advertisement -

३. झाडू कधीही घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ठेवू नये. झाडू घराच्या बाहेर असणे अशुभ मानले जाते.

४. वास्तू शास्त्रानुसार घरातील झाडू कधीही उघड्यावर ठेऊ नये. झाडू उघड्यावर ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच झाडू कधीही उभा ठेऊ नये. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते. शिवाय झाडू कधीही बाहेरील व्यक्तींना न दिसेल असा ठेवावा.

५. शक्यतो झाडू दरवाज्याच्या मागे आडवा ठेवावा, जेणेकरून तो बाहेरील व्यक्तींच्या नजरेत येणार नाही.

६. झाडूने कधीही कोणाला मारू नये, शास्त्रात हे अशुभ मानले जाते.

७. घरामध्ये कधीही तुटलेला झाडू ठेवू नये. यामुळे तुम्हाला आर्थिक संकट उद्भवू शकते.

हेही वाचा :Vastu Tips : घरात या दिशेला कॅलेंडर लावल्याने; चमकेल तुमचे भाग्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -