Vastu Tips : घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोप्पे उपाय

आपल्या देशात धार्मिक गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा निसर्ग निर्मित गोष्टींना फार महत्त्व असतं. निसर्गामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या समस्यांवर उपाय शोधू शकतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा हवी असते, घरातील वास्तुदोषामुळे घरातील सकारात्मकतेचा अभाव निर्माण होतो. यामुळे घरात आजारपण, कलह, कौटुंबिक मतभेद, आर्थिक चणचण भासणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी अनेक सोप्पे उपाय करु शकता ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

अनेकदा घर वास्तू शास्त्राप्रमाणे नसल्याल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोप्पे उपाय

Vastu Tips:नकारात्मकता लाती हैं घर में रखी ये चीजें, बनी रहती है धन की कमी  - Vastu Tips To Remove Negative Energy From Home In Hindi - Amar Ujala  Hindi News Live

  • घराचे दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरुन घरात सूर्याचा प्रकाश येईल आणि हवा खेळती राहिल. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा दूर जाणवत नाही.
  • घराबाहेर तुळशीचे रोपटे तसेच इतर झाडे लावा, यांमुळे देखील घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
  • घर नेहमी स्वच्छ ठेवा, स्वच्छ घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
  • घरात सुगंधी द्रव्य शिंपडा जेणेकरु घरात दुर्गंधी येणार नाही.
  • दररोज सकाळ-संध्याकाळ घरातील देवासमोर दीप-धूप लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचारते.
  • घरात संध्याकाळी कापूर, लवंग जाळा यामुळे देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
  • घरातील तुटलेल्या अनावश्यक वस्तू काढून टाका, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
  • घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात जास्त मोरपंख ठेवा.

 


हेही वाचा :

Vastu Tips : स्वयंपाकघरात कधीही ठेऊ नका ‘या’ गोष्टी; नाहीतर वाढेल दारिद्र्य