Vastu Tips : तुमच्या पाकिटातील ‘ही’ गोष्ट आजच काढून टाका; नाहीतर होईल नुकसान

या गोष्टी तुमच्या पाकिटामध्ये ठेवल्याने तुम्हाला धनहानीचा सामना करावा लागू शकतो. शिवाय सतत आर्थिक चणचण देखील निर्माण होऊ शकते.

अनेकदा आपण पाहतो की स्त्रिया किंवा पुरूष आपल्या पाकिटामध्ये पैशांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी ठेवतात. ज्या गोष्टीची त्यांना अजिबात गरज नसते. तुम्हाला ही गोष्ट सामान्य वाटत असेल मात्र वास्तू शास्त्रानुसार, नकोत्या गोष्टी तुमच्या पाकिटामध्ये अजिबात ठेऊ नका ज्या अशुभ मानल्या जातात. या गोष्टी तुमच्या पाकिटामध्ये ठेवल्याने तुम्हाला धनहानीचा सामना करावा लागू शकतो. शिवाय सतत आर्थिक चणचण देखील निर्माण होऊ शकते. तुम्हीसुद्धा तुमच्या पाकिटामध्ये विणाकारण नकोत्या गोष्टी ठेवत असाल तर त्याआधी सावध रहा.

पाकिटामध्ये ‘या’ गोष्टी ठेवल्याने होऊ शकते धनहानी

 

  • पाकिटात कधीही कोणतेही जुणे बिल, कागद ठेवू नका, कारण जुण्या गोष्टींचे बिल, पावती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.यामुळे तुमची आर्थिक घडी विस्कटू शकते.
  • पाकिटात कधीही राग, द्वेष, ईर्ष्या उत्पन्न करणारे फोटो नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. असे फोटो फक्त घरातच नाही तर तुमच्या घरातही ठेवू नका.
  • पाकिटात कधीही देवी देवतांचे फोटो सुद्धा ठेवू नये.कारण आपण पाकिटाला कोणत्याही ठिकाणी घेऊन जातो त्यामुळे नकळत आपले अस्वच्छ हात पाकिटाला लागतात. यामुळे देवी देवतांचा तुमच्याकडून नकळत अपमान होतो.
  • अनेकजण पाकिटात किल्ली सुद्धा ठेवतात. परंतु पाकिटात किल्ली ठेवल्याने तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
  • अनेकजण पाकिटात पैशांच्या नोटची घडी घालून ठेवतात. मात्र पाकिटात कधीही नोटेची घडी घालून ठेऊ नये. कारण यामुळे पैशांचा अपमान होतो कारण पैशांचा अपमान म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे आहे.पाकिटात नोट नेहमी व्यवस्थित ठेवावे.
  • पाकिटात कधीही पैशांव्यरिक्त कोणतीही अशुभ गोष्ट ठेवू नका. तसेच पाकिट नेहमी स्वच्छ आणि चांगल्या अवस्थेत असावे. फाटलेले पाकिट कधीही वापरू नये.

 


हेही वाचा :http://Vastu Tips : कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी लवंग आणि कापुराचे ‘हे’ उपाय नक्की करून पाहा