वास्तु शास्त्रात प्रत्येक दिशेला खास महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्या दिशेला काय करावे, काय करू नये? कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवायला हवी, कोणती नाही? अश्या अनेक गोष्टी वास्तू शास्त्रात सविस्तर सांगण्यात आल्या आहेत. घराची दिशा जर बरोबर असेल तर, तुम्हाला प्रत्येक प्रकारचे सुख प्राप्त होईल. परंतु घरातील दिशा आणि घरातील काही वस्तू चुकीच्या दिशेला असतील तर मात्र तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान भोगावे लागू शकते.
वास्तु शास्त्रात चुकीच्या दिशेला झोपल्याने, चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्याने देखील तुम्हाला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
कोणत्या दिशेकडे तोंड करून जेवणे उत्तम
- पूर्व दिशा
जर तुम्ही जेवताना पूर्वेकडे तोंड करून बसला तर, तुमचे सर्व आजार बरे होतात. हिंदू धर्मात पूर्व दिशेला देवतांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला तोंड करून जेवल्याने आयुष्य वाढते. शिवाय रोग कमी होतात. - पश्चिम दिशा
वास्तु शास्त्रात पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवल्याने नोकरी मध्ये उत्तम यश प्राप्त होते. तसेच आरोग्य देखील सुधारते. - उत्तर दिशा
उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धन, संपत्तीचे आगमन होते. घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. - दक्षिण दिशा
वास्तु शास्त्रात केवळ दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे अशुभ मानले जाते. शिवाय या दिशेला तोंड करून जेवल्याने आर्थिक संकट उद्भवते. तसेच ही दिशा यमदेवाची दिशा असल्याने या दिशेला तोंड करून जेवल्याने आयुष्य कमी होते.