Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Vastu Tips : घरामध्ये 2023 चे नवे कॅलेंडर लावण्यापूर्वी जाणून घ्या, 'या'...

Vastu Tips : घरामध्ये 2023 चे नवे कॅलेंडर लावण्यापूर्वी जाणून घ्या, ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Subscribe

2023 सुरु होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष आपल्यासोबत अनेक गोष्टी घेऊन येते. नव्या वर्षासोबत अनेक बदल देखील होतात. यामध्ये आपल्या घरातील कॅलेंडरचा मोठा सहभाग असतो. परंतु नवीन कॅलेंडर घरामध्ये लावण्यापूर्वी काही विशिष्ट नियमांचे पालन करणं महत्वाचं असतं.

कॅलेंडरचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तुमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. वास्तुनुसार एक योग्य दिशा निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे जर हे चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागू शकते. परंतु कॅलेंडर जर योग्य दिशेला असेल तर घरात सुख-शांती टिकून राहते आणि घरात सकारात्मकता सुद्धा येते. तसेच ते कशा पद्धतीचे असावे याबाबत खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

घरामध्ये नवीन कॅलेंडर लावताना ‘या’ नियमांचे करा पालन
Calendar Stock Photo - Download Image Now - Calendar, Time, Calendar Date -  iStock

  • 2023 चे नवीन कॅलेंडर लावण्यापूर्वी सर्वात आधी 2022 चे जुने कॅलेंडर भिंतीवरुन काढून घ्या, शिवाय ते घरात फार काळ ठेवू नका.
  • घरामध्ये कधीही जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावू नये.
  • वास्तु शास्त्रानुसार कॅलेंडर नेहमी घराच्या उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावे.
  • जर तुम्हाला सामाजिक कार्यात प्रगती करायची असेल तर , कॅलेंडर घराच्या पूर्व दिशेस लावावे.
  • तुम्हाला आयुष्यात नवी संधी मिळवण्यासाठी तसेच व्यवसायात, नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी कॅलेंडर घराच्या उत्तर दिशेला लावा.
  • घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच घरात पैसे टिकण्यासाठी कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावा.
  • कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  • कॅलेंडर दरवाजाच्या मागे कधीही लावू नये. यामुळे कुटुंबातील व्यक्तींवर अशुभ परिणाम होतो.
  • तसेच कॅलेंडरवरील नेहमी सकारात्मक चित्र किंवा देवी-देवतांचे फोटो असावे.
  • हिंसक प्राणी, दुःख चेहरे असे नकारात्मक चित्र असलेले कॅलेंडर घरात लावू नये.

हेही वाचा :

Vastu Tips : रात्री शांत झोप लागत नाही? मग करा ‘हे’ वास्तू उपाय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -