हिंदू धर्मात देवा समोर दिवा लावणं अत्यंत पवित्र मानलं जातं. दिवा लावल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याची अथवा पूजेची सुरुवात होत नाही. दिव्यामुळे आसपासची नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मकता पसरु लागते. आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरातील देवासमोर दिवा लावतो. मात्र, हा दिवा नक्की तूपाचा लावावी की तेलाचा असा अनेकांना प्रश्न पडतो.
खरंतर, दिवा तूपाचा असो किंवा तेलाचा हे दोन्ही आपल्या सकारात्मकता देतात. मात्र, वास्तू शास्त्रानुसार तेलाच्या दिव्याच्या तुलनेत तूपाचा दिवा अधिका फायदेशीर आहे.
तूपाचा दिवा लावण्याचे फायदे
हिंदू धर्मात दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा सुरु केली जात नाही. देवघरात तेलाच्या तूलनेत तूपाचा दिवा सर्वोत्तम मानला जातो. यामुळे देवी लक्ष्मी घरात निरंतर वास करतात. घरात सुख-समृद्धी येते. तसेच घरातील वास्तू दोष देखील दूर होतो. मात्र, हा दिवा नेहमी गायीच्या शुद्ध तूपाचा असावा.
तेलाचा दिवा लावण्याचे फायदे
तेलाचा दिवा लावण्याचे देखील अनेक फायदे आहेत. मात्र, यात राई, तीळ यांसारख्या तेलाचा वापर करावा. देवघरात कधीही अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल वापरु नये.
जर, तुम्हाला मंदिरात तेल आणि तूप हे दोन्ही लावयचे असल्यास तुम्ही तूपाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूला लावा आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला लावा. तसेच दिव्याचे तोंड नेहमी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिणेकडे तोंड करुन कधीही लावू नये. दक्षिणेकडील दिवा केवळ पितरांसाठी लावला जातो.
हेही वाचा :