Vastu Tips : घरातील सुख-शांतीसाठी फेंगशुईचे काही महत्वाचे नियम

फेंगशुईमध्ये सुद्धा वास्तू शास्त्राप्रमाणेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे. फेंगशुईमध्ये याच गोष्टींसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. जर याचे पालन केले तर, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेकदा कुटुंबातील कलह-क्लेश घरातील सुख-शांतचा नाश करतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. अशात फेंगशुईच्या वास्तु नियमांचे पालन करणं खूप महत्वपूर्ण मानले जाते. यामुळे आयुष्यातील अनेक समस्यांचे समाधान केले जाते.

वास्तूसाठी फेंगशुईचे काही महत्वाचे नियम

  • फेंगशुईमध्ये सांगण्यात आलं आहे की, घराच्या शेजारी कोणतही मंदिर नसावं. जर एखाद्या ठिकाणी मंदिर असेल तर त्या जागेच्या जवळपास घर घेऊ नये. असं म्हणतात की, मंदिराची सावली आपल्या घरावर पडू नये. तसेच मंदिराच्या शिखरावरील ध्वजाची सावली सुद्धा घरावर पडू नये.
  • घराच्या मागील दरवाजा समोरच्या दरवाजासमोर असू नये. असं मानलं जात की, दोन दरवाजे समोरासमोर असल्याल घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा लगेच दुसऱ्या दरवाजाने घराबाहेर जाते.
  • फेंगशुईनुसार, घरातील स्वयंपाकघर आणि शौचालय हे समोरासमोर नसावे. जर असं झाल्यास दरवाज्यावर एक क्रिस्टल बॉल टांगून ठेवा.
  • घराच्या मध्यभागी पायऱ्या बनवू नये. यामुळे घरातील कुटुंब प्रमुखाला हृदयविकार होऊ शकतो.
  • फेंगशुईनुसार, घरातील खिडक्या बाहेरच्या बाजूला खुलणाऱ्या असाव्या. यामुळे घरामध्ये प्राण ऊर्जेचा प्रवाह अधिक होतो. घरात कधीही पैश्यांची कमतरता भासत नाही.

हेही वाचा :Vastu Shastra : घरामध्ये आर्टिफिशियल फुलांचा वापर करणं टाळा; नाहीतर होईल नुकसान