घरभक्तीVastu Tips : घरामध्ये मनी प्लांट लावण्याआधी 'या' गोष्टींची घ्या काळजी

Vastu Tips : घरामध्ये मनी प्लांट लावण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरातील आर्थिक समस्या दूर व्हावी या हेतूने लावलं जातं. परंतु वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेच आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

वास्तु शास्त्रात घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये झाडं लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. झाडांमुळे आजूबाजूचा परिसर सुंदर आणि सकारात्मक होतो. अनेक जण घर किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणं पसंत करतात, मनी प्लांट लावणं जितकं सोपं आहे, तितकंच त्याची काळजी घेणं त्याहून सोपं आहे. मनी प्लांटला तुम्ही बॉटल किंवा फ्लॉवर पॉटमध्ये लावू शकता. खरं तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरातील आर्थिक समस्या दूर व्हावी या हेतूने लावलं जातं. परंतु वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेच आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

मनी प्लांट लावण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

Vastu Tips: Keep these things in mind while planting money plant... - Kalam  Times

- Advertisement -

मनी प्लांट नेहमी योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे, हे कधीही उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेस लावू नये. कारण या दिशेस मनी प्लांट लावल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं, मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला ठेवायला हवे. कारण या दिशेला भगवान गणेश वास करतात, ज्यामुळे या दिशेला मनी प्लांट लावल्याने कल्याण आणि समृद्धी प्राप्त होते.

मनी प्लांट ही एक वेगाने वाढणारी वनस्पती आहे, त्यामुळे या झाडाची वेल कधीही जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. याच्या वेलींना दोरीचा आधार द्यायला हवा म्हणजे तो वर चढेल. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटची वाढती वेल समृद्धीचे प्रतीक आहे. मनी प्लांटला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्यामुळेच ते जमिनीला स्पर्श करणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी.

- Advertisement -

या वास्तू टिप्समुळे तुम्हाला व्यवसायात भरपूर यश मिळेल

Vastu Tips: Not taking care of money plant can lead to financial  difficulties | Vastu News – India TV

  •  वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही सुकू देऊ नये. खरंतर घरातील कोणतंही झाड कधी सुकू देऊ नये, कारण सुकलेले झाड हे दुर्भाग्य आणि नकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे.
  •  मनी प्लांट नेहमी घराच्या आतमध्ये ठेवा, याला जास्त उन्हाची गरज नसते, त्यामुळे ते नेहमी घरातच ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या बाहेर ठेवणं अशुभ मानलं जातं. बाहेरच्या हवामानात ते सहज सुकते आणि त्याची योग्य वाढ होत नाही. झाडाची वाढ खुंटणे अशुभ मानले जाते.
  • वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नये. असे केल्यास शुक्र ग्रह क्रोधित होतो, त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागेल.

हेही वाचा :

Vastu Tips : रात्री झोपण्यापूर्वी करा हे एक काम; आयुष्यभरासाठी व्हाल मालामाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -