Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : घरात असे असावे स्वयंपाकघर

Vastu Tips : घरात असे असावे स्वयंपाकघर

Subscribe

वास्तुशास्त्रानुसार घर, स्नानगृह, शयनकक्ष आणि स्वयंपाकघर यांच्या बांधकामासाठी शुभ दिशा सांगण्यात आल्या आहेत. असं मानलं जातं की या गोष्टी शुभ दिशेला असल्यास व्यक्तीचे जीवन सुखी होते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराची दिशा निश्चित केल्याने देवी अन्नपूर्णा घरात वास करते आणि व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबियांना माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक मान्यतेनुसार, माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करत असते. यासाठीच जाणून घेऊयात किचनशी संबंधित वास्तू  टिप्स.

या दिशेला बांधा स्वयंपाकघर :

वास्तुशास्त्रानुसार , स्वयंपाकघर बांधण्यासाठी आग्नेय दिशा उत्तम मानली जाते. असे समजलं जातं की या दिशेला स्वयंपाकघर केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच वास्तू दोष कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहतात. याशिवाय धान्याचे भांडार नेहमी भरलेले राहते आणि तेथे माता अन्नपूर्णा वास करते.

Vastu Tips The kitchen should be like this in the house

स्लॅब असावा या दिशेला :

याशिवाय स्वयंपाकघरात स्लॅब योग्य दिशेला असणेही महत्त्वाचे आहे. स्लॅब दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा. स्लॅ भांडी आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी वापरला जातो.

या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष :

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील खिडकी पूर्व दिशेला असावी.
स्वयंपाकघर हे पिवळ्या आणि हलक्या लाल रंगात रंगवावे. असे मानले जाते की हे रंग अग्निच्या देवतेशी संबंधित आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की किचनला चुकूनही काळा रंग लावू नये, कारण काळा रंग हा वास्तुशास्त्रानुसार अशुभ समजला जातो.
काही कारणाने स्वयंपाकघर शुभ दिशेला बनत नसेल तर स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवावे . असं म्हणतात की  स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात, कारण या वनस्पतीमध्ये धनाची देवता वास करते अशी मान्यता आहे. आणि तुळशीमातेची योग्य पूजा केल्यास आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते व आर्थिक लाभही मिळतो.

हेही वाचा : Health Tips : फिटनेस रुटीन फॉलो करून वाढवा प्राेडक्टिव्हिटी


Edited By – Tanvi Gundaye

Manini