वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही वास्तू दोषांमुळे लग्न करण्यास उशीर होणे, लग्नानंतर पतीपत्नीमध्ये भांडणं होणे, आपसातल्या मतभेदांमुळे एकदुसऱ्यांपासून वेगळे होण्याची वेळ येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. तुमच्या घरातील वास्तू ही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या भावना उत्पन्न करू शकते.
वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास प्रत्येक जोडप्यामध्ये प्रेम आणि सामंजस्य असायला हवे. परंतु काही वेळेस नकळतपणे होणारे लहानसहान वास्तू दोष कलह निर्माण करू शकतात. वास्तूशास्त्रानुसार, घराची सजावट , दिशा-निर्देश यांचे काही नियम सांगण्यात आले आहेत. तुमच्या घरातील प्रत्येक स्थानाची योग्य दिशा आणि सकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव नात्यांतील प्रेम आणि समर्पण वाढवू शकतो. जाणून घेऊयात काही अशा वास्तू उपायांबद्दल.
बेडरूममध्ये लावू नका कुटुंबियांचा फोटो :
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची वास्तू टीप म्हणजे कधीच तुमच्या बेडरुममध्ये कुटुंबातील व्यक्तींचा फोटो लावू नये. बेडरुममध्ये केवळ पतीपत्नीचाच फोटो असायला हवा. यामुळे घरात नेहमी आनंदी वातावरण राहिल.
बेडरुम हे वैवाहिक जीवनाचे केंद्र आहे. हे घरातील एक असं स्थान आहे जिथे पतीपत्नी यांचे नाते अधिकच मजबूत बनते. बेडरुममध्ये वास्तूशास्त्राचा विचार करत सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे तुमच्या नात्यावर सकारात्मक परिणाम करत असते.
पतीपत्नीची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असणे सर्वात शुभ समजले जाते. ही दिशा स्थिरता आणि विश्वासाचे प्रतीक आहे. ज्यामुळे नाते अधिकच मजबूत होते. तुम्ही बेडरुममध्ये लाल, गुलाबी आणि हलक्या पांढऱ्या रंगाच्या बेडशीटचा वापर करा. हे रंग प्रेम आणि सकारात्मकता दर्शवतात.
घरात प्रकाश आणि सुगंध यांचे योग्य नियोजन करा :
सकारात्मक ऊर्जा घरात रहावी याकरता घरात प्रकाश आणि सुगंधी वातावरण असणे आवश्यक आहे. हे केवळ मानसिक समाधानच देत नाही तर नात्यत ताजेपणा आणण्याचेही काम करते. लग्न झालेल्या जोडप्याने नियमितपणे गुलाब, चमेली किंवा लेव्हेंडर यांसारख्या सुगंधी मेणबत्त्या लावाव्या. यामुळे वातावरण सुगंधी तर होतंच पण पतीपत्नीमधील तणावही कमी होतो. बेडरूममध्ये हलका प्रकाशही आणि हवाही खेळती रहायला हवी. तुम्ही या उपायांसोबतच बेडरुममध्ये नैसर्गिक रोपं जसे की मनीप्लांट वगैरे ठेवू शकता. यामुळे जीवनातील सकारात्मकता वाढते.
बेडरुममध्ये ठेवू नये देवघर :
कधीही लग्न झालेल्या बेडरुममध्ये मंदिर किंवा देवघर ठेवू नये. घरातील देवघराचं स्थान नेहमी वेगळं असलं पाहिजे. मंदिरासाठी नेहमी स्वतंत्र स्थान ठेवायला हवं. आणि त्याची दिशाही योग्य असायला हवी. वास्तूशास्त्रानुसार, देवघराचं स्थान नेहमी उत्तर -पूर्व दिशेला असायला हवं. हे स्थान घरातील पावित्र्य तर राखतंच पण घरात सकारात्मक ऊर्जेचाही संचार होतो.
हेही वाचा : Wedding Rukhwat : लग्नात रुखवत का दिलं जातं? जाणून घ्या
Edited By – Tanvi Gundaye