घरभक्तीVastu Tips : घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या धार्मिक...

Vastu Tips : घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…

Subscribe

कापूर जाळून देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक उर्जेचा नायनाट होतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जात. त्यासोबतचं घरामध्ये कापूर जाळणं वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही चांगल मानलं जात.

हिंदू धर्मात कापूर, धूप, दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अनेक काळापासून या परंपरा चालू आहेत. कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चांगलं मानलं जातं. कापूर अनेक रोगांमध्येही जबरदस्त फायदेशीर ठरतो. तुम्हाला आश्चर्यच वाटेल परंतु, कापूर अनेक औषधांच्या निर्मितीमध्येही सुद्धा वापरला जातो.

- Advertisement -

घरामध्ये कापूर जाळण्याचे धार्मिक महत्त्व

  • घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहते, शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो.
  • घरातील वाद-विवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
  • हिंदू मान्यतेनुसार घरात कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतो. घरात रोज सकाळ-संध्याकाळी नियमित तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने पितृदोष लवकर कमी होतो.
  • गायीच्या शेणकुटावर कापूर ठेवून जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. शिवाय वाईट नजरेपासून बचाव होतो.
  • घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर, घरात कापूर जाळणं तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

घरामध्ये कापूर जाळण्याचे वैज्ञानिक महत्त्व

- Advertisement -
  • विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घरात कापूर जाळल्याने घरातील सूक्ष्म जंतूचा नायनाट होतो. शिवाय घरातील वातावरण देखील शुद्ध होतं.
  • घरात कापूर जाळल्याने संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. कोरोना काळातही अनेकांकडून घरात कापूर जाळण्याची माहिती दिली जात होती.
  • यासोबतच कापूर जाळल्याने कफ, स्नायूंचा ताण, मानदुखी, सांधेदुखी यांसारख्या आजारांमध्येही आराम मिळतो.
  • आयुर्वेदातही कापूर तेलाचा वापर खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
  • प्रदूषण आणि इतर कारणांमुळे सध्या बहुतेक लोकांचे केस गळतात आणि केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. नारळाच्या तेलात मिसळून कापूर केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केस गळतीपासून आराम मिळतो.

हेही वाचा :Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार स्टोअर रुम कुठे असायला हवी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -