Monday, January 20, 2025
HomeमानिनीVegan Ghee : तेलापासून बनवा शुद्ध तूप

Vegan Ghee : तेलापासून बनवा शुद्ध तूप

Subscribe

आपल्या स्वाद आणि आरोग्यदायी गुणांसाठी ओळखले जाणारे शुद्ध तूप भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरात वापरले जाते. पोळी, शिरा यांपासून ते पावभाजी, डोसा अशा सर्व पदार्थांमध्ये तूपाचा वापर केला जातो. आपल्या आरोग्यासाठीही तूप वापरण्याचे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. तूप आपली पचनशक्ती सुधारण्याचे काम करते. केसांवरची आणि त्वचेवरची चमक कायम ठेवायची असेल तर नियमित तूपाचे सेवन करावे. हे तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यातही मदत करते. हृदय , मांसपेशी आणि सांधे यांना मजबूत ठेवण्याचंही काम तूप करत असते. या सर्व गुणांनी समृद्ध असलेल्या तूपाची किंमत मात्र अधिक असते. ज्यामुळेच बाजारात मिळणारे स्वस्त दरातील तूप भेसळयुक्त असण्याची शक्यता अधिक असते. जे तूप खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पडू शकतो. यासाठीच घरी तूप बनवणे हे केव्हाही चांगलं. तुम्हाला माहित आहे का दुधाशिवायही तूप बनवता येऊ शकतं. जे तुम्हाला दुधापासून बनवलेल्या तूपाइतकेच फायदे देऊ शकेल. जाणून घेऊयात दुधाशिवाय बनवता येऊ शकणाऱ्या या शुद्ध तूपाविषयी.

Vegan Ghee : Make pure ghee from oil

दुधाशिवाय तूप कसे बनवाल ?

साहित्य :

हे बनवण्याकरता तुम्हाला अर्धा कप नारळ तेल, 2 पेरूची पाने, 5 कढीपत्ते , 1 चिमूट हळद आणि आवडीनुसार मीठ या गोष्टींची आवश्यकता आहे.

वेगन शुद्ध तूप बनवण्याची कृती :

ज्या पदार्थांमध्ये दुधाचा वापर केला जात नाही अशा पदार्थांना वेगन पदार्थ म्हटले जाते.

वेगन तूप बनवण्यासाठी सर्वात आधी नारळाचे तेल एका पॅनमध्ये घेऊन मध्यम आचेवर गरम करुन घ्या. जेव्हा तेलामधून धूर येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा.

यानंतर कढीपत्त्याची पाने आणि पेरुची पाने यांना हातावर घेऊन चोळत तेलामध्ये टाका. नंतर यात हळद पावडर मिक्स करा.

आता या पानांना कमीत कमी 1 तासासाठी तेलातच राहू द्यात.

हे झाल्यावर तेल गाळून घ्या. हे गाळलेले तेल एका हवाबंद डब्यात ठेवा. अशाप्रकारे वेगन शुद्ध तूप तयार आहे.

हेही वाचा : Beauty Tips : सौंदर्य प्रसाधनासाठी उपयुक्त वेलची


Edited By – Tanvi Gundaye

Manini