शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिसीज सारख्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो. आपण अनेकदा असे पदार्थ खातो ज्यात तेलाचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे नसांमध्ये नको असलेली चरबी वाढते. मात्र आज तुम्हाला अशा 5 भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
वांग
भारतात वांगी खूप आवडीने खाल्ली जातात. वांग्याचा भरता हा भारतात खूप प्रसिद्ध आहे. मात्र वांग्यामध्ये कमी कॅलरीस् आणि सॉल्युबल फायबरचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या भाजीचा लो कोलेस्ट्रॉल आहारात समावेश केला जातो.
कांदा
भाज्यांची चव वाढवण्यासाठी भारतात सर्वाधिक कांद्याचा वापर केला जातो. हे फायबरचा एक रिच सोर्स आणि कॅलोरी फूड आहे, जर कांदा सलाड म्हणून वापरत असाल तर ज्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
भेंडी

भेंडी ही एक भाजी आहे जी आपल्या घरांमध्ये सामान्यतः वापरली जाते, त्यात भरपूर प्रमाणात सॉल्युबल फायबर आढळते, तसेच हा लो कॅलरी डाइट आहे, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे सोपे होते.
लसूण
लसणात अँटी-हायपरलिपिडेमिया प्रॉपर्टीज आढळतात, ज्यामुळे आपल्या नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच चांगल्या कोलेस्ट्रॉलची लेव्हल देखील सुधारते. त्याचा प्रभाव गरम असतो त्यामुळे उन्हाळ्यात लसणाचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.
फरसबी

फरसबी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ लागते, त्यामुळे त्याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. खरं तर फरसबीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असतात.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ही माहिती अवलंबण्यापूर्वी नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. माय महानगर याची पुष्टी करत नाही.)