भाज्या अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. पण, बहुतेक जणांना भाज्या सोलून खायला आवडतात.
अनेक जणांना अशी सवय असते भाज्यांची साले सोलून त्या बनविल्या जातात. पण, काही भाज्यांच्या सालींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे भाज्यांच्या साला काढल्यावर तेही सालीसोबत निघून जातात. ज्याने भाज्यांमधून मिळणारे पोषणही कमी होते. त्यामुळे कोणत्या भाज्यांच्या साली आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पाहुयात,
बटाटा –
बहुतेक जणांना बटाटा साल काढल्यानंतरच खातात. पण, असे करणे चुकीचे आहे. बटाटयाच्या सालीमध्ये पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन सी आदी पोषक घटक असतात. त्यामुळे बटाटा सालीसकटच खायला हवा.
मुळा –
मुळा सालीसह खायला हवा. मुळ्याच्या सालींमध्ये फायबर, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स असतात.
रताळे –
रताळ्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन इ, बीटा कॅरोटीन सारखे पोषकतत्वे असतात. त्यामुळे रताळी सालीसह खायला हवीत.
दुधी –
अनेक गृहिणी दुधीची साल काढून त्यानंतर त्याची भाजी बनवतात. पण असे करणे टाळायला हवे. दुधीच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, अँटी – ऑक्सीडेंट्स असे पोषक घटक असतात.
या भाज्यांच्या सालींमध्ये आरोग्यच्या खजिना दडला असला तरी भाज्या जेव्हा त्यांच्या साल स्वच्छ आणि योग्य असेलच तेव्हाच खाव्यात. खराब आणि अस्वच्छ सालींसह भाज्या खाल्याने आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde