घरलाईफस्टाईलरोजच्या भाजीला द्या एक वेगळा ट्विस्ट; 'या' पद्धतीने द्या फोडणी नावडती भाजीही...

रोजच्या भाजीला द्या एक वेगळा ट्विस्ट; ‘या’ पद्धतीने द्या फोडणी नावडती भाजीही होईल आवडती

Subscribe

काहींच्या रोजच्या भाज्या या चविष्ट होत नाहीत. एखादी भाजी चविष्ट बनविणे हे काही वाघाड कमी नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या भाजीच्या कृतीमध्ये काही साध्या आणि सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही रोजच्या भाजीची सुद्धा चव वाढवू शकता. जाणून घ्या या काही सोप्या टिप्स.

निरोगी आयुष्यासाठी योग्य आणि सकस आहार घेणे सुद्धा गरजेचे असते. रोजच्या आहारामध्ये भाज्या सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात. भाज्या सर्वांच्याच आहाराचा एक महत्वपूर्ण भाग असतात. भाज्यांमुळे अनेक पोषक तत्वे सुद्धा मिळतात. मात्र काही काही भाज्या ह्या खाली अजात नाहीत, त्या कितीही वेगळ्या पद्धतीने बनविल्या तरीही त्या चविष्ट होत नाहीत. अश्यावेळी काही गोष्टींच्या साहाय्याने तुम्ही भाज्यांची टेस्ट वाढवू शकता. पण काहींच्या रोजच्या भाज्या या चविष्ट होत नाहीत. एखादी भाजी चविष्ट बनविणे हे काही वाघाड कमी नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या भाजीच्या कृतीमध्ये काही साध्या आणि सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही रोजच्या भाजीची सुद्धा चव वाढवू शकता. जाणून घ्या या काही सोप्या टिप्स.

हे ही वाचा – एकदम सोप्पी रेसिपी! क्रंची, स्पायसी आणि चिझी फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे…

- Advertisement -

कसुरी मेथीचा भाजीमध्ये वापर करा –

कसुरी मेथीचा भाजीमध्ये वापर केल्यामुळे भाजीला उत्तम चव येते त्याचसोबत भाजीला उत्तम सुगंध सुद्धा येतो. भाजी बनवून झाल्यानंतर कसूर मेथी मॅश करून भाजीवर घालावी. त्याने भाजी चविष्ट होईल.

- Advertisement -

मोठी वेलची –

मोठी किंवा काळी वेलची ही चविला उत्तम असते. साहस ही वेलची पुलाव किंवा भाताचे इतर प्रकार बनविण्यासाठी वापरली जाते. भाजी चवीष्ट बनविण्यासाठी तुम्ही मोठी वेलची मसाला म्हणून भाजीमध्ये वापरू शकता.

कढीपत्ता –

कढीपत्य्याचा वापर हा दाक्षिणात्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात करतात. कढीपट्ट्याच्या खमंग फोडणीने भाजी चविष्ट बनते. त्याच सोबतकढीपत्ता आरोग्यसाठी आणि केसांसाठी सुद्धा गुणकारी असतो.

गरम मसाला –

गरम मसाल्यामध्ये सर्व मसाल्यांचे मिश्रण असते त्यामुळे भाजीला उत्तम चव येते. त्याचबरोबर भाजीच्या फोडणीमध्ये गरम मसाला घालून मंद आचेवर परतल्याने त्या मसाल्यांची चव भाजीत उतरते.

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -