जगभरात प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोंबरला वर्ल्ड व्हेजिटेरियन डे साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश असा की, व्हेज फूड्स फायद्याप्रति लोकांना जागृक करणे. उत्तम आरोग्यासाठी नेहमीच व्हेजिटेरियन फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. सर्वसामान्यपणे लोकांना असे वाटते की, नॉन व्हेज खाणाऱ्यांच्या तुलने शाकाहारी फूड टेस्टी नसते.
उत्तम आरोग्यासाठी शरीराला सर्व पोषक तत्त्वांची गरज असते. अशातच व्हेज फूड्सच्या मदतीने शरीरातील सर्व व्हिटॅमिन्सची कमतरता दूर होऊ शकते. ताजी फळं, भाज्या खाऊन तुम्ही फिट राहू शकता.
-हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आरोग्य बिघडते. यामुळे हृदयाचे आरोग्य संतुलित राखायचे असेल आणि आजारांपासून दूर रहायचे असेल तर शाकाहारी फूड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचसोबत हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर युक्त फूड्स जसे की, नट्स, शेंगदाणे याचे सेवन करावे.
-ब्लड प्रेशर कंट्रोल होते
काही रिसर्चमध्ये समोर आले आहे की, ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी व्हेज डाएट फॉलो करावा. हाय ब्लड प्रशर यामुळे कंट्रोल होऊ शकते. शाकाहारी भोजनात फॅट्स, सोडियमचे प्रमाण कमी असते. जे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त व्हेज फूड्समध्ये काही फळं आणि भाज्यांचा समावेश केल्यास तुम्हाला पुरेसे पोटॅशिअम मिळते.
-हाडांसाठी फायदेशीर
जी लोक व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये हाडांसंदर्भातील आजारांचा धोका कमी असतो. खरंतर दूध, पनीर, नट्स, टोफू, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. याच्या सेवनाने हाडं मजबूत होतात.
-वजन कमी करण्यास फायदेशीर
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर व्हेज डाएट फॉलो करा. साधं जेवणं सुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास फायदेशीर ठरेल. नॉन-व्हेज फूड जसे की, चिकन, मासे यामध्ये कॅलरीज अधिक असतात. ते खाल्ल्याने वजन वाढू शकते.