Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health व्हेजिटेरियन लोकांना असतो हिप फ्रॅक्चरचा धोका

व्हेजिटेरियन लोकांना असतो हिप फ्रॅक्चरचा धोका

Subscribe

आपण हेल्दी रहावे म्हणून विविध उपाय करतो. खरंतर आपण जे काही खातो, जी लाइफस्टाइल फॉलो करतो त्यावरुनच तुम्ही किती हेल्दी राहता हे अवलंबून असते. आजकालच्या काळात बहुतांश लोक मीट खाणे टाळत आहेत. कारण यामुळे होणारे आजार. विविध रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, मीट अधिक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, हार्ट आणि कॅन्सर सारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. मात्र ब्रिटेनमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार मीट न खाल्ल्यास व्यक्तीवर होण्याऱ्या नुकसानी बद्दल ही सांगितले गेले.

ब्रिटेनमध्ये झालेल्या एका अभ्यासातून असा दावा करण्यात आला आहे की, व्हेजिटेरियन लोकांमध्ये हिप फ्रॅक्चर होण्याचा धोका मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा अधिक असतो.

- Advertisement -

ब्रिटेनमध्ये मीट, पेस्केटेरियन आणि व्हेजिटेरियन लोकांमध्ये हिप फ्रॅक्चरच्या धोक्याबद्दल एक रिसर्च करण्यात आला होता. त्यात धक्कादायक बाब अशी समोर आली. त्या अभ्यासातून असे समोर आले की, अशा महिला आणि पुरुष जे शाहाकारी आहेत त्यांच्यामध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका 50 टक्के अधिक असतो.

- Advertisement -

बीएमसी मेडिसिनट्रेस्टेड मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार शाकाहारी भोजन करणाऱ्या काही लोकांमध्ये प्रोटीन आणि अन्य आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असू शकते. त्यामुळे हाडं आणि स्नायू कमजोर होऊ शकते. लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की, हाड फ्रॅक्चर होऊ नये म्हणून संतुलित आणि पोषक तत्वयुक्त आहार खाल्ला पाहिजे.

संशोधकांनी असे म्हटले की, शाहाकारी लोकांमध्ये हिप फ्रॅक्चरचा धोक्यामागील कारण म्हणजे लोअर बॉडी मास इंडेक्स असू शकतो. कमी बीएमआयचा अर्थ असा होतो की, स्नायू आणि हाडं पूर्णपणे हेल्थी नसणे. यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून दूर राहण्यासाठी शरिराला महत्त्वाच्या वसाची गरज असते.


हेही वाचा- सांधे आणि अंगठ्यात जमा झालेले Uric Acid ‘या’ गोष्टींनी होईल दूर

- Advertisment -

Manini