Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल Velvet Sofa असा करा स्वच्छ

Velvet Sofa असा करा स्वच्छ

Subscribe

घरात सर्वाधिक वापर सोफाचा केला जातो. खरंतर लिविंग रुममध्ये सोफा सेट घरातील पाहुण्यांना बसण्यासाठी खासकरुन ठेवला जातो. मात्र घरात एकत्रितपणे टीव्ही पाहणे, विरंगुळा म्हणून बसण्यासाठी केला जातो. अशातच त्यावर डाग पडले आणि अस्वच्छ होणे सामान्य बाब आहे. जर सोफा मखमलचा असेल तर थोडी समस्या येऊ शकते. कारण याचे सॉफ्ट फॅब्रिकची अधिक केअर करण्याची गरज असते. (velvet sofa cleaning tips)

खरंतर मखमलचा सोफा अधिक आरामदायी असल्याच्या कारणास्तव बहुतांश लोक तो घेतात. मात्र तरीही घरात वेलवेटच्या सोफाचा वापर करणाऱ्या लोकांना हे माहिती नसते की, त्याची स्वच्छता कशी करावी? याच बद्दलच्या काही टीप्स आम्ही सांगणार आहोत.

- Advertisement -

वॅक्युम क्लिनरचा वापर
मखमलच्या सोफ्यावर धुळ अगदी सहज जमा होते. यामुळे कापडाने झाडणे फार मुश्किल होते. यामुळे वॅक्युम क्लीनरचा वापर करा. जर घरात पाळीव प्राणी असेल तर त्यांचे केस सोफ्याला लागतात. ते हटवण्यासाठी लिंट रोलरचा वापर करू शकता.

असे हटवा डाग
जर मखमलच्या सोफ्यावर चुकून चहा, कॉफी किंवा ज्यूस पडल्यास तर टिश्यूने पुसण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर डाग हटवण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी आणि डिश लिक्विड मिक्स करुन त्याचे मिश्रण तयार करा. एका सफेद कापडाने किंवा मऊ ब्रशने ते स्वच्छ करा.

- Advertisement -

दुर्गंध हटवण्यासाठी हा करा उपाय
जर वेलवेटचा काउच किंवा सोफ्यामधून दुर्गंध येत असेल तर त्यापासून दूर राहण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी सूती कापडावर बेकिंग सोडा ठेवून 2-3 पोटली तयार करा. आता त्या सोफ्यात टाकून 1-2 दिवस ठेवा. असे केल्याने दुर्गंधी निघून जाईल. कारण बेकिंग सोड्यात दुर्गंध अवशोषित करण्याचे गुण असतात.


हेही वाचा- डिटर्जेंटशिवायही धुवू शकता कपडे

- Advertisment -