Monday, February 12, 2024
घरमानिनीHealthशरीरातील मांसपेशींना मजबूत ठेवण्यासाठी वीरभद्रासन फायदेशीर

शरीरातील मांसपेशींना मजबूत ठेवण्यासाठी वीरभद्रासन फायदेशीर

Subscribe

योगासने आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशातच आपण जी काही योगासने करत असतो त्याचा परिणाम शरीराच्या नेमक्या आणि विशिष्ट भागांवर होत असतो. अशातच शरीरातली मांसपेशींना मजबूत ठेवण्यासाठी विरभद्रासन हे आसन अतिशय फायदेशीर आहे. यासोबतच विरभद्रासन करताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच हे आसन स्नायूंना बळकट करण्यास खूप मदत करते.

विरभद्रासन ही एक जुनी योग मुद्रा आहे. या योग आसनात दोन्ही पाय पुढे-मागे आणि एक हात वरच्या दिशेने असतो. विरभद्रासनाद्वारे मणक्याला लवचिक बनवता येते. तसेच हे आसन केल्याने शरीरातील अनेक महत्त्वाचे स्नायू ताणले जातात आणि स्नायू मजबूत होऊ लागतात. यासोबतच हे आसन केल्याने अनेक मानसिक आजारांवर उपचार करता येतात. ज्यामुळे तुमचे शरीर हलके होते.

- Advertisement -

The Ultimate Guide To Warrior I Pose — Virabhadrasana I - YOGA PRACTICE

– वीरभद्रासन  कसे करावे जाणून घेऊया…

हे आसन करण्यासाठी प्रथम सपाट जमिनीवर चटई पसरवा आणि त्यावर सरळ उभे राहा.

- Advertisement -

आता डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे हलवा.उजवा गुडघा हळूहळू वाकवा आणि डावा गुडघा सरळ ठेवा.

या दरम्यान उजव्या पायाचे बोट सरळ असावे आणि डाव्या पायाचे बोट डाव्या बाजूला असावे.

दीर्घ श्वास घेऊन उजवा पाय वर करा आणि डावा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवा.हा योगासन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कालावधीसाठी करू शकता आणि नंतर हळूहळू सामान्य स्थितीत येऊ शकता.

– वीरभद्रासन करताना या गोष्टी लक्षात ठेवा…

हे आसन करण्यापूर्वी वॉर्म अप करा.

यासोबतच जेवल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर लगेच योगासने करू नका.

महत्वाचे म्हणजे आसन करताना कंबर आणि मान सरळ ठेवा.


हेही वाचा : रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने होतात अनेक फायदे

- Advertisment -

Manini