आता 2025 सुरु व्हायला अवघे काही दिवसचं उरले आहेत. लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. डिसेंबर महिन्यात बऱ्याच सुट्या असल्यामुळे लोक फिरायला जायचा प्लॅन करतात. डिसेंबर महिन्यात बऱ्याच जागेचं बुकिंग हे फूल असत त्यामुळे बऱ्याच लोकांना बुकिंग फूल झाल्यामुळे कुठे जाता येत नाही. अशावेळी तुम्ही 2025 मध्ये नवीन वर्षात कुठे तरी जाऊ शकता. तुम्हाला बुकिंग देखील सहजपणे मिळेल आज आपण जाणून घेऊयात 2025 मध्ये कोणत्या सुंदर ठिकाणांनी आपण जाऊ शकतो.
न्नार, केरळ
दक्षिण भारतातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे मुन्नार,हे नवीन वर्षात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. रॉकी टेकड्या, चहाचे मळे आणि हवेशीर हवामान यामुळे उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
महाबळेश्वर
सुंदर खोऱ्याने भरलेल्या निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या तापमान 20 आणि 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम आहे.
कॅनडा
तुम्ही या नवीन वर्षात कॅनडाला देखील जाऊ शकता. कॅनडाला बघण्यासारखी बरेच ठिकाण आहेत. तुम्ही या ठिकाणी जाऊन एक नवीन अनुभव घेऊ शकता.
राजस्थान
फिरायला जाण्यासाठी राजस्थान उत्तम आहे. राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आणि सुंदर ठिकाणे आहेत. येथे भव्य स्थापत्य आणि शाही वारशासाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये फिरण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत जिथे जाऊन तुम्ही फिरू शकता.
अंदमान निकोबार
अंदमान निकोबार हे खूप निसर्गसौंदर्य आहे आणि येथील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी खूप खास आहेत. जर तुम्हाला समुद्राची आवड असेल तर तुम्ही निश्चितपणे अंदमान निकोबार या ठिकाणाला भेट देऊ शकता.
गोवा
तुम्ही या नवीन वर्षात गोव्याला देखील जाऊ शकता. गोवा खूप सुंदर असे ठिकाण आहे. पर्यटकांसाठी गोवा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
हेही वाचा : Winter Travelling : गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणांना द्या भेट
Edited By : Prachi Manjrekar